Sujay Vikhe : अजितदादांकडून 100 कोटी आणायचं ठरवलं होतं, पण..; महापौर निवडीत ‘नो घोडेबाजार’, विखे-जगतापांची कणखर भूमिका

Ajit Pawar to Bring 100 Crore Fund for Ahilyanagar After BJP-NCP Power Shift : अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी अजितदादांकडे 100 कोटी रुपयांच्या निधीच मागणीवर भाजपचे सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया...
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar development fund : "अहिल्यानगरमध्ये भाजप-अजित पवार राष्ट्रवादीचा महापौर-उपमहापौर निवड होताच, अजितदादांकडून राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये अहिल्यानगरसाठी 100 कोटींचा विकास निधी मागण्याची आमची तयारी होती.

\पण दुर्दैवाने अजितदादांचे अपघाती निधन झाले. शहरात प्रचंड प्रश्न आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या माध्यमातून ते सोडवू. तसंच महापौर-उपमहापौर निवडीत जो घोडेबाजार चालायचा, तो या वेळी आम्ही हाणून पाडला," असा दावा भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला.

अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदी अन् उपमहापौरपदी भाजप-अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी युतीमधील ज्योती गाडे आणि धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीवेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पदाच्या निवडीवेळी होणारा घोडेबाजार, तमाशा आम्ही रोखला, असा दावा केला.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, "राज्यात फक्त अहिल्यानगरमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचा महापौर झाला आहे. हा विजय आम्ही अजितदादांना समर्पित करतो. महापौर-उपमहापौरपदाच्या विराजमान होताच, आम्ही अजितदादांकडे अहिल्यानगर शहर विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मागायला जाणार होतो. पण दुर्दैवाने अजितदादांचे अपघाती निधन झाले आणि ते आता राहून गेलं आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या माध्यमातून शहर विकाससाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहू."

Sujay Vikhe
Ajit Pawar Banner row : अजितदादांच्या श्रद्धांजली फलकावर बुलडोझर! ‘CMO’ना बसणार दणका? प्रांताधिकाऱ्यांचा अहवाल, प्रशासनात खळबळ!

'पदाधिकारी निवडीवेळी जो शहरात घोडेबाजाराचा तमाशा चालायला तो सर्वांना माहित आहे. तो यंदा प्रथमच बंद केला. मी तर एवढं ऐकलं आहे की, विकास कामांचे ठराव करण्यासाठी महापालिकेत पैसे द्यावे लागायचे. आता ती गरज भासणार नाही. आम्ही निवडणुकीपूर्वी वचननामा प्रसिद्ध केला नव्हता. आता सत्तेत आहोत. आता तो प्रसिद्ध करू अन् त्यानुसार काम करू,' असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

Sujay Vikhe
Mayor Jyoti Gade : महापौर ज्योती गाडे; 'सोधा' राजकारणाचा राजकीय वारसा

तीन महिन्यात विकास आराखडा

'पुढील तीन महिन्यात शहर विकासाचा आराखडा मांडला जाणार आहे. तो नगरसेवक आणि नागरिकांपुढे मांडला जाईल. हाच आमचा वचननामा असेल. त्यानुसार काम करू. उपनगर विकासाला यात सर्वात अगोदर प्राधान्य असेल. विकासाचा समतोल राखण्याचं आव्हान आहे. तो आम्ही दोघे नक्की साधू. अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यांना गती देण्याचा देखील प्रयत्न असणार आहे,' असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com