BJP Politics : भाजप घेणार नाशिकच्या नगरसेवकांची शाळा; उपस्थितीच्या सक्तीने वाढली धास्ती!

BJP training program corporators : नाशिकमधील नगरसेवकांसाठी भाजपकडून सक्तीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून उपस्थितीच्या नियमामुळे प्रतिनिधींमध्ये चिंता वाढली आहे. सविस्तर बातमी वाचा.
BJP Politics : भाजप घेणार नाशिकच्या नगरसेवकांची शाळा; उपस्थितीच्या सक्तीने वाढली धास्ती!
Published on
Updated on

Trimbakeshwar BJP News : पार्टी विथ डिफरन्स असा दावा करणाऱ्या भाजपने नगरसेवकांना त्याचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. लोक संपर्क वाढविण्यासाठी नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी आज त्र्यंबकेश्वर येथे खास कार्यशाळा होत आहे.

राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये भाजपने जोरदार कामगिरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बहुतांशी नगरपालिकांमध्ये पक्षाची सत्ता आहे. त्यासाठी पक्षाने सर्वस्व पणाला लावले होते.

BJP Politics : भाजप घेणार नाशिकच्या नगरसेवकांची शाळा; उपस्थितीच्या सक्तीने वाढली धास्ती!
8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार? या तारखेला ठरणार 'आठव्या वेतन आयोगा'चे भविष्य; पगार किती वाढणार?

आता निवडणुकांचा हंगाम संपला आहे. मात्र विविध स्तरावर सुरू असलेल्या शासकीय आणि धोरणात्मक कामकाजाबाबत नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप विरोधकांनी पक्षाला टार्गेट केले आहे. त्या दृष्टीने पक्षाने खास धोरण आखले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग अशी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याची पूर्ण तयारी झाली आहे.

आज त्र्यंबकेश्वर येथे नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांची शाळा भरविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थिती सक्तीची आहे. या कार्यशाळेसाठी नगरसेवकांना आवर्जून उपस्थित राहण्याच्या सूचना आहेत. अनुपस्थित नगरसेवकांची वेगळ्या पातळीवर दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवकांमध्ये उपस्थितीसाठी धास्ती आहे. विविध विषयांतील तज्ञ या कार्यशाळेत नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी नऊ विषयांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासकीय कामकाजांबरोबरच लोकसंपर्क अधिक कार्यक्षम करण्यावर भर असेल.

BJP Politics : भाजप घेणार नाशिकच्या नगरसेवकांची शाळा; उपस्थितीच्या सक्तीने वाढली धास्ती!
Ashok Kharat expose : मोठा खुलासा! जगासमोर आज येणार अशोक खरातचा विकृत चेहरा; तेजस्वी सातपुते उलगडणार मोठे गुपित!

मतदार याद्यांचे पुनर्नरीक्षण आणि भाजपने हाती घेतलेल्या अन्य कार्यक्रमाबाबत नगरसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी सक्षम नेते घडविण्याचा उद्देश आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या कार्यशाळेच्या समारोपाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे नगरसेवकांना लोकसंपर्क आणि पक्षाची प्रतिमा संवर्धनासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. संघटनात्मक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नियोजनात मुख्य भूमिका बजावणार आहेत. विविध विषयांतील नऊ तज्ञ नगरसेवकांची कार्यशाळा घेतील. त्यात संवाद आणि मार्गदर्शन अशा दोन्ही स्तरावर नगरसेवकांना कार्यक्षम करण्यात येणार आहे.

बहुतांशी पदाधिकारी आणि नगरसेवक प्रदीर्घ काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. महापालिकेतील नियम आणि कायदे यांपासून कामकाजात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. ते असले तरीही सर्वच नगरसेवकांना उपस्थिती सक्तीचे करण्यात आली आहे. पार्टी विथ डिफरन्स या संदर्भात नगरसेवकांनी या कार्यशाळेबाबत उपस्थित राहण्यासाठी धास्ती घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com