Vivek Kolhe : ‘कोल्हे आमदार होईपर्यंत चप्पल नाही’; 6 वर्षे अनवाणी राहिलेल्या कार्यकर्त्याची शिर्डीत भावनिक संकल्पपूर्ती

Vivek Kolhe Supporter Ends 6-Year Barefoot Vow in Shirdi After MLA Victory: विवेक कोल्हेंच्या आमदारकीनंतर वासुदेव शिंदेंनी साईबाबांच्या साक्षीने घातली नवी चप्पल; नेता-कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू, शिर्डीत भावनांचा उद्रेक झाला आहे.
Vivek Kolhe supporter barefoot story
Vivek Kolhe supporter barefoot storySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political worker emotional dedication story: कोपरगावच्या राजकारणात निष्ठा, भावना आणि कार्यकर्त्यांचे समर्पण अधोरेखित करणारा एक हृदयस्पर्शी प्रसंग शिर्डीत पाहायला मिळाला. “कोल्हे परिवारातील कुणी आमदार होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,” असा संकल्प करणारे युवा कार्यकर्ते वासुदेव शिंदे यांनी तब्बल सहा वर्षांनंतर आपला संकल्प पूर्ण केला.

भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर साईनगरी शिर्डीत त्यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी पायात नवी चप्पल घातली.

या क्षणी नेता आणि कार्यकर्ता दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत “साईराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला. कार्यकर्त्यांची आपल्या नेत्यावरील निष्ठा किती टोकाची असू शकते, याचे जिवंत उदाहरण या प्रसंगातून पाहायला मिळाले. या आगळ्यावेगळ्या संकल्पपूर्तीच्या वेळी विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पत्नी रेणुका कोल्हे याही उपस्थित होत्या.

2019 च्या विधानसभेच्या कोपरगाव (Kopargaon) निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा अवघा चारशे मतांनी पराभव झाला होता. त्याच दिवशी वासुदेव शिंदे यांनी अनवाणी राहण्याचा संकल्प केला होता. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये विवेक कोल्हे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली आणि अखेर शिर्डीत साईबाबांच्या साक्षीने शिंदे यांनी आपल्या संकल्पाची पूर्तता केली.

Vivek Kolhe supporter barefoot story
Sandeep Kotkar BJP : विधान परिषदेसाठी ‘मास्टरस्ट्रोक’? संदीप कोतकर यांची भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा

संकल्पपूर्तीपूर्वी विवेक कोल्हे यांनी पत्नीसमवेत साई समाधीचे दर्शन घेतले. या वेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गजानन शर्वेकर, सचिन शिंदे, सचिन तांबे आणि आकाश त्रिपाठी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Vivek Kolhe supporter barefoot story
Ahmednagar Legislative Council election : विधान परिषदेसाठी 461 मतदार ठरले? नगराध्यक्षांचे ‘डबल वोटर’ प्रकरण चर्चेत, तर 'कॅन्टोन्मेंट' सदस्य मतदार यादीत!

आमदार विवेक कोल्हे म्हणाले, “गेल्या सहा वर्षांत कोल्हे परिवाराकडे कोणतीही सत्ता नव्हती. तरीही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिली. वासुदेव शिंदे यांच्यासारखा कार्यकर्ता सहा वर्षे अनवाणी राहतो आणि मला आमदारकी मिळाल्यानंतर संकल्पपूर्ती करतो, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक क्षण आहे.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com