Captain Ashok kharat: रूपाली चाकणकरांना पुन्हा दणका, माजी सहकारी म्हणाली, वाट कसली बघता, नैतिकता असेल तर लगेच राजीनामा द्या!

Resignation demand against Rupali Chakankar: भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली खऱात यांना चहुबाजूंनी घेरले, राजीनाम्यासाठी रोज होतेय मागणी
Rupali Chakankar with Captain Ashok Kharat
Rupali Chakankar with Captain Ashok KharatSarkarnama
Published on
Updated on

Captain Ashok Kharat scandal: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याभोवती राजकीय अडचणींचा विळखा वाढत आहे. त्याचा मोठा आणि नकारात्मक परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रतिमेवर होत आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर काय निर्णय घेतात, याबाबत रोज नव्या विषय चर्चेत आहेत.

आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या माजी सहकारी आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अनिता भामरे यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी चाकणकर या राजीनामा देण्यासाठी कसली वाट पहात आहेत. त्यांनी कितीही अन्यत्र लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला, तरी ते शक्य होणार नाही, असे म्हटले.

भाजपच्या अनिता भामरे यांनी चाकणकर यांच्या विरोधात पत्रक देखील प्रसिद्धीस दिले आहे. त्या म्हणाल्या, नैतिकतेला धरून चाकणकरांनी तातडीने राजीनामा द्यावा. त्या जेव्हढा विलंब करतील. तेव्हढी समाजात त्यांची राजकीय प्रतिमा डागाळणार आहे.

Rupali Chakankar with Captain Ashok Kharat
BJP Sujay Vikhe controversy : हा कुठला प्रसाद? ते जेवणचं..; साईप्रसादावर सुजय विखेंचं पुन्हा विधान!

अनेक महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्यांवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट अशोक खरात यांच्याशी चाकणकर यांचे थेट संबंध असल्याचे अनेक पुरावे पुढे आले आहेत. त्यामुळे चाकणकरांनी काहीही राजकीय फंडे वापरले तरी, त्या खरात प्रकरणातील त्यांची भूमिका नाकारू शकत नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Rupali Chakankar with Captain Ashok Kharat
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर फरार, राष्ट्रवादीतील महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ

जागतिक महिला दिनी व्यासपीठावरून बाबासाहेबांच्य संविधानाचे महत्त्व सांगणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष३ चाकणकर यांनी तरी संविधान वाचले की नाही, ही शंका येते. महिलांना चार वाट्या, पाच तांट, दोन चमचे सासरी जातांना देण्यापेक्षा संविधानाची प्रत द्या हे केवळ बोलून चालणार नाही. ते खरोखर मनात आणि विचारात उतरवावे लागेल, असे भामरे म्हणाल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कर्मकांडावर किंचीतही विश्वास नव्हता. मात्र त्यांचे नाव घेणाऱ्या बोलघेवड्या चाकणकरांचे वर्तन त्याउलट असल्याचे दिसून येते. नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने भोंदू बाबा अशोक खरातला अटक केली आहे. पोलीस त्याची चौकशी करतीलच परंतू चाकणकरांची आणि खरात यांची जवळीक पाहता चौकशीत अडथळा येऊ शकतो.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांचे भोंदू बाबा अशोक खरात यांच्या समवेत अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच महिला आयोग बदनाम होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत चाकणकरांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा. अन्यथा राज्यातील महिलांना राजीनामा घेण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com