Shocking News: आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मतदारसंघातील ‘गाव विकणे आहे’

Village for Sale In Nashik: कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने माळवाडी (देवळा) येथील उद्विग्न ग्रामस्थांचा ठराव
Villagers of Malegaon
Villagers of MalegaonSarkarnama

Nashik News: शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या राजकीय झळा भाजपला (BJP) बसु लागल्या आहेत. त्यामुळे वातावरण तापु लागले आहे. अशीच घटना भाजप आमदार डॉ. राहुल आहेर (Dr. Rahul Aher) यांच्या देवळा-चांदवड मतदारसंघात घडली आहे. माळवाडी येथील (Farmers) ग्रामस्थांनी निषेधार्थ सोमवारी एकत्र जमत संपूर्ण गावच शासनाला (Maharashtra) विकण्याचा ठराव केला. (Villagers passed resolution to sale of Malvadi Village)

Villagers of Malegaon
Nashik Politics: गिरीश महाजन यांची काँग्रेस-भाजप सलोखा एक्सप्रेस!

कांदा या परिसरातील प्रमुख पिक आहे. सध्याचा कांदा साठवताही येत नाही आणि भाव नसल्याने विकताही येत नाही. त्यातून कांद्यासह इतर शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतकरी उद्विग्न झाल्याचे चित्र आहे. त्याची राजकीय झळ राज्य शासन व भाजपला बसत आहे. भाजपचे आमदार व खासदार असलेल्या या गावाचा लिलाव करण्याचा ठराव चर्चेचा विषय ठरला.

Villagers of Malegaon
BJP News; आमदार दिलीप बोरसे यांनी रस्त्यांसाठी आणले १५ कोटी

माळवाडी गावातील शेतकरी सुमारे ५३४ हेक्टरवर शेती व्यवसाय करतात. त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जाते. गेल्या तीन-चार वर्षांपासून कोणत्याही शेतमालाला अपेक्षित दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.

शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा पैसाही शेती व्यवसायात उपलब्ध होत नसल्याने आर्थिक समीकरणे कोलमडून गेली आहेत. दैनंदिन गरजा व खासगी, सरकारी बँकांची कर्जे चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उरलेला नसल्याने माळवाडीतील ग्रामस्थांनी एकत्रित येत संपूर्ण गाव विकण्याचा ठराव केला.

Villagers of Malegaon
Shivsena News: दादा भुसेंच्या मतदारसंघात परिवर्तन होईल?

शासन शेतकरीहितापेक्षा ग्राहकहिताला प्राधान्य देत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पण आत्महत्या करण्यापेक्षा गाव विकून मिळणाऱ्या पैशांत तरी जगता येईल, या उद्वेगातून हा ठराव करण्यात आला. शासनाने शेतकऱ्यांच्या गरजा भागवणे व कर्जमुक्त करण्याइतका तरी शेती उत्पादित मालाला भाव मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे आणि ते सरकारने विकत घ्यावे, अशी मागणी शेतकरी प्रवीणअण्णा बागूल, अमोल बागूल, राकेश सोनवणे, अविनाश बागूल, अक्षय शेवाळे आदी शेतकऱ्यांनी केली. त्यास गावातील इतर शेतकऱ्यांनी दुजोरा देत पाठिंबा दर्शविला.

या वेळी सर्वानुमते ठराव पास करण्यात आला. त्यावर संदीप बच्छाव, शिवाजी बागूल, प्रशांत बच्छाव, वैभव बच्छाव, महेश बागूल, महेंद्र बागूल, उदय बागूल, रोहन बागूल आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com