Nashik BJP News : बडगुजर प्रवेशाविरोधात भाजपच्या तिन्ही आमदारांची एकजूट, मोठ्या नेत्याकडे धाव

BJP MLAs Unite Against Sudhakar Badgujar’s Entry : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांना भाजपकडून पक्षात घेण्याची तयारी सुरु झाली आहे. एवढ्या एक-दोन दिवसांतच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Nashik BJP News, Sudhakar Badgujar, MLAs Seema Hire, Devyani Farande, Rahul Dhikle
Nashik BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik politics : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांना भाजपकडून पक्षात घेण्याची तयारी सुरु झाली आहे. एवढ्या एक-दोन दिवसांतच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बडगुजर यांच्यासह पक्षाला सोडून गेलेल्या आणखी काही माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार असून त्यांची नावेही पुढे आली आहे. त्यामुळे या आयारामांचा प्रवेश रोखण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्यासह नाशिकच्या भाजपच्या तिन्ही आमदारांनी प्रयत्न सुरु केले आहेत. स्थानिक तिन्ही आमदारांसह त्यांच्यासोबत असलेला माजी नगसेवकांचा गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणत्याही परिस्थिती नाशिक महानगरपालिकेवर भाजपला पुन्हा सत्ता आणायची आहे. भाजपने नाशिक महापालिकेसाठी शंभर प्लस चा नारा दिला आहे. त्यासाठी निवडून येणारे चेहेरे भाजपकडून हेरले जात आहेत. त्यामुळे मोठे इन्कमिंग पक्षात सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून सुधाकर बडगुजर यांना भाजप पक्षात घेत आहे. मात्र भाजपच्या पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी या प्रवेशाला सर्वप्रथम विरोध केला. त्यानंतर भाजपच्या तिन्ही आमदारांमध्ये आता अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे तिन्ही आमदारांना डावलत भाजपने बडगुजरांच्या प्रवेशाची तयारी केली आहे.

त्यामुळे आता भाजपच्या तिन्ही आमदारांनी बडगुजर यांच्यासह इतरांच्या पक्षप्रवेशाविरोधात दंड थोपाटले आहेत. गेल्या निवडणुकीत अंगावर केसेस झेलून माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामे केली आहेत. अशात बडगुजर यांच्यासारखा वादग्रस्त चेहरा पक्षात घेतल्यास सामन्य कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल. त्यामुळे माझ्यासह पूर्व व मध्यचे आमदार असे आम्ही तिघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे.

Nashik BJP News, Sudhakar Badgujar, MLAs Seema Hire, Devyani Farande, Rahul Dhikle
Sudhakar Badgujar Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुधाकर बडगुजर यांचा होणार भाजप प्रवेश!

सीमा हिरे व सुधाकर बडगुजर दोघांचा विधानसभा मतदारसंघ एकच आहे. त्यामुळे दोघांमध्ये मोठा राजकीय वाद आहे. गेल्या निवडणुकीतही दोघांमध्ये मोठा वाद उफाळला होता. आजवर बडगुजर यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनी भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊ नये अशी आमदार सीमा हिरे यांची भूमिका आहे. त्यांनी बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल असून त्यांना पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होईल असेही सीमा हिरे यांचे म्हणणे आहे.

Nashik BJP News, Sudhakar Badgujar, MLAs Seema Hire, Devyani Farande, Rahul Dhikle
Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरेंच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांना अटक, स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याला फटकावले!

बडगुजर यांच्या भाजप प्रवेशासोबतच नाशिक पूर्व व नाशिक मध्य या दोन मतदारसंघातूनही पक्षाला सोडून गेलेल्या काही माजी नगरसेवकांची नावे पुढे आली आहे. त्यात पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, कमलेश बोडके, मध्यमधून डॉ. हेमलता पाटील यांच्या देखील भाजप प्रवेशाची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक आमदारांनी याविरोधात एकजुट केली आहे. हा प्रवेश रोखण्यासाठी ते फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com