Devendra Fadnavis Politics : फडणवीस शब्द विसरले, मंत्रीपदाचा शब्द दिलेल्या आमदाराला केलं थोडक्यात खूश..

Rahul Aher MLA : चांदवड मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल आहेर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. त्या सभेत फडणवीस यांनी राहुल आहेर यांना निवडून आल्यास मंत्री करण्याचा शब्द दिला होता.
MLA Rahul, CM Devendra Fadnavis
MLA Rahul, CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच नगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. भाजपने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे नाशिक उत्तर व नाशिक दक्षिण असे दोन भाग केले आहेत. चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्तर विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मात्र राहुल आहे यांच्याकडे नाशिक उत्तर विभागाची जबाबदारी देत पक्षाने त्यांना थोडक्यात खूश केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याला कारणही तसेच आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वत: भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड मतदार संघात प्रचार सभा घेतली होती. पक्षाचे उमेदवार राहुल आहेर यांच्यासाठीच ती सभा झाली होती.

या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड मतदारसंघातील उपस्थितांना जाहीरपणे आश्वासन दिलं होतं. तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो असं फडणवीस म्हणाले होते. वीस हजाराच्या आत मताधिक्य असल्यास राज्यमंत्री तर वीस हजाराहून अधिक मताधिक्य असल्यास राहुल आहेर यांना कॅबिनेट मंत्री करेल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं.

MLA Rahul, CM Devendra Fadnavis
Maharashtra Politics : वंचितमध्ये भूकंप ! कुणाच्या कारभाराला कंटाळून २०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले?

त्यानुसार राहुल आहेर यांना चांदवड मतदारसंघातून लोकांनी मोठ्या मताधिक्यांनी विजयी केलं. आहेर यांनी हॅट्रिक केली. आहेर यांना एक लाख चार हजार मते मिळाली व ते अठ्ठेचाळीस हजार ९६१ मताधिक्याने विजयी झाले. मात्र त्यानंतर महायुती सरकारमधील मंत्रीमंडळाचे वाटप करताना फडणवीस यांची मोठी अडचण झाली. ते राहुल आहेर यांना दिलेला शब्द पहिल्या टर्ममध्ये पूर्ण करु शकलेले नाही.

MLA Rahul, CM Devendra Fadnavis
Nitesh Rane Politics: कुंभमेळ्यात मुस्लिमांची दुकाने हवी कशाला? राणेंचा मुस्लिम विरोध पुन्हा उफाळला; भाजपला मतदान करत नसल्याचा आरोप

राहुल आहेर हे फडणवीस यांच्या अपेक्षा पेक्षा अधिक मतांनी निवडून आले. त्यानंतर फडणवीस दिलेला शब्द पाळतील या आशेत चांदवड मतदारसंघातील जनता होती. मतदार संघात तर त्यावरुन पैंजा लागल्या होत्या. पण त्यानंतर त्यांची निराशा झाली. त्यामुळे मंत्री पदाचा शब्द न पूर्ण करता आल्याने फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देत आहेर यांना थोडक्यात खूश केल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com