Dada Bhuse Politics : नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या जिल्हा समितीचे अध्यक्षपद ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आले आहे. असे करताना पालकमंत्री व एकनाथ शिंदे गटाचे दादा भुसे यांना या समितीत दुय्यम स्थान देऊन त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. (State Government declared Simhasth Kumbh mela Committee for Nashik)
राज्य शासनाने (Maharashtra Government) ही समिती (Nashik) नियुक्त करताना त्यातून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि दादा भुसे (Dada Bhuse) या दोघांनाही मुख्य प्रवाहातून बाजूला केले आहे. त्यामुळे आगामी काळातील बदलत्या राजकारणाची ही नांदी तर नव्हे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक स्तरावरील उत्सव असतो. त्यात देशभरातील साधू-संत तसेच राजकीय, सामाजिक संस्था सहभागी असतात. त्यासाठी मोठा खर्च केला जातो. त्यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा समावेश असतो. विकासकामांच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणांवर या समितीमार्फत नियंत्रण केले जाते. त्यात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सहअध्यक्ष करून त्यांना राजकीयदृष्ट्या बाजूला सारण्यात आल्याचे बोलले जाते.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने शिखर समितीची घोषणा करताना ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ, दादा भुसे व गिरीश महाजन यांना दुय्यम पदे देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे सूत्रे ठेवली आहेत.
पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्ष पद देण्यात आले आहे. सामान्यतः सिंहस्थ कुंभमेळ्याचे बहुतांशी काम ही समिती करते. राज्य स्तरावर एक समिती आहे. ही समिती नाममात्र असते आणि केवळ धोरणात्मक निर्णय घेते. त्यामुळे भुजबळ यांच्या मनात नाशिकच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. ते सतत पालकमंत्री असल्याच्या अविर्भावात वावरत असतात. त्यांनाही शासनाने अर्थात भाजपने पद्धतशीर बाजूला केले, असे म्हणता येईल. कारण अन्न व नागरी पुरवठामंत्री असलेल्या भुजबळ यांची नियुक्ती राज्य शिखर समितीवर करण्यात आली आहे.
महाजन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असले तरी त्यांच्यासाठी नाशिकमध्ये झालेली एऩ्ट्री महत्त्वाची मानली जात आहे. महाजन यांच्या पुनरागमननाने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने शिखर समितीसह सहाय्य ठरणाऱ्या समित्यांची घोषणा केली. शिखर समितीला सहाय्य करण्यासाठी चार समित्यांची स्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले.
ट्रिपल इंजिन सरकारची घोषणा झाल्यानंतर पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळविण्याच्या स्पर्धेत नाशिकचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी दादा भुसे, छगन भुजबळ व गिरीश महाजन यांच्या स्पर्धा होती व अजूनही आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.