Shivsena Vs Congress: राहुल गांधींना धमकावणं पडलं महागात, अखेर ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Mahavikas Aaghadi News : शिवसेनेचे वादग्रस्त कार्यकर्ते बाळा दराडे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांना आव्हान दिले होते. राहुल गांधी नाशिकला आल्यास यांच्यावर शाही फेक करून तोंडाला काळे फासण्यात येईल. या संदर्भात शिवसेनेच्या भूमिकेलाही त्यांनी आव्हान दिले होते.
Rahul Gandhi And Bala Darade
Rahul Gandhi And Bala Darade Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत खटक्यावर खटके उडाल्याचं लपून राहिलेलं नाही. यातच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर म्हणून उल्लेख करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वारंवार महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अडचणीत आणलं. पण यावेळी सावरकरांविरोधात केलेल्या टिप्पणीवरुन ठाकरेंच्या शिलेदारानं थेट राहुल गांधींच्या तोंडालाच काळं फासण्याची भाषा केली होती. यावरुन आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत घमासान सुरू झालं होतं. अशातच आता पोलिसांनी ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेचे वादग्रस्त कार्यकर्ते बाळा दराडे अडचणीत आले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्टंट करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनीही दराडे यांची नाकेबंदी केली.तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनीही कार्यकर्त्यांसह अंबड पोलिसांंची भेट घेत यारप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

शिवसेनेचे (Shivsena) वादग्रस्त कार्यकर्ते बाळा दराडे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांना आव्हान दिले होते. राहुल गांधी नाशिकला आल्यास यांच्यावर शाही फेक करून तोंडाला काळे फासण्यात येईल. या संदर्भात शिवसेनेच्या भूमिकेलाही त्यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला होता.

महाविकास आघाडी गेली खड्ड्यात. सावरकर आणि हिंदुत्व यासाठी आम्ही राहुल गांधींच्या वाहनांचा ताफा अडवून त्यावर दगडफेक करू अशी आक्षेपार्ह आणि चितावणी देणारे वक्तव्य त्यांनी केले होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याशी हरकत घेत ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे दराडे अडचणीत येण्याची शक्यता होती.

Rahul Gandhi And Bala Darade
Mahayuti Government News: फडणवीस सरकारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय; येत्या 1 जूनपासून सरकारी कार्यालयात 'या' फाईल्सला 'नो एन्ट्री'

दराडे यांच्या वक्तव्यानंतर संभाजी ब्रिगेड सक्रिय झाली. आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दराडे यांना थेट आव्हान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती की नाही? त्यांना ब्रिटिश सरकार पेन्शन देत होते की नाही? या प्रश्नावर दराडे यांनी चर्चेला यावे असे खुले आव्हान संभाजी ब्रिगेडने दिले. या विषयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातही वैचारिक गोंधळ असल्याचा आरोप ब्रिगेडने केला होता.

राहुल गांधी नाशिकला आल्यास संभाजी ब्रिगेड त्यांच्या वैचारिक भूमिकेचे समर्थन करेल. त्यांची भूमिका हीच बहुतांशी सुजाण, सुज्ञ आणि शिक्षित नागरिकांची भूमिका आहे. दडपशाही करून कोणाचेही तोंड बंद करता येणार नाही, असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष गायधनी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi And Bala Darade
Gokul Milk : 'गोकुळ' अध्यक्षपद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; वरिष्ठ नेत्यांचा 'मुश्रीफांवर' दबाव, कोल्हापूरमध्ये हालचाली वाढल्या

यासंदर्भात काँग्रेसचे सिडकोतील अध्यक्ष विजय पाटील यांनी बाळा दराडे यांचा तीव्र शब्दात निषेध केला होता. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ त्यांनी ठीक ठिकाणी होर्डिंग लावून गांधी यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे आज दिवसभर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हा विषय चर्चेचा ठरला.

सकाळी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष विजय पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन तक्रार केली. राहुल गांधी यांच्या जीविताला धोका आहे. या स्थितीत दराडे यांनी केलेले वक्तव्य गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

Rahul Gandhi And Bala Darade
Vaishnavi Hagawane: '...तर ती गाडी पेटवण्याची धमकी!'; वैष्णवीच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा; पत्रकार परिषदेतच ढसाढसा रडले

त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या मागणीची दखल घेतली. याबाबत शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील सूचना केल्या होत्या. दराडे यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री दराडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com