Dr. Bharti Pawar News : नेपाळच्या कांद्याचा भारती पवार करणार वांदा!

Centre minister of state assures farmers on onion issue-केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत कांदा आयात होणार नाही असे आश्वासन दिले.
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti PawarSarkarnama

Nashik News : राज्यातील सर्वात संवेदनशील कांदा उत्पादक नाशिक जिल्ह्यात आहेत. गेले काही दिवस घसरणाऱ्या कांदा दरामुळे ते चिंतेत आहेत. याबाबत नेपाळहून कांदा आयात होऊ देणार नाही, असे आश्वासन देत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. (Nashik onion growers are worried due to falling onion prices)

कांदा (Nashik) उत्पादकांचा (Farmers) प्रश्न तीव्र होत आहे. भाव घसरत आहेत. त्यामुळे नेपाळचा कांदा आयात होऊ देणार नाही असे आश्वासन भाजपच्या (BJP) मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिले आहे.

Dr. Bharti Pawar
Sinner News : मतदारसंघ माणिकराव कोकाटेंचा; मतदारांचा धावा बाळासाहेब थोरातांकडे!

कांद्यांचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून कांदा विक्री केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने राजकारण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी असे होणार नाही. तसेच नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात देखील केला जाणार नसल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

दरम्यान, या प्रश्नावर विरोधी पक्ष राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नाफेडने स्थानिक बाजारात कांदा विक्री केल्यास भाव पाडणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. असे होणार नाही. नाफेडच्या माध्यमातून बाजारभाव पडतील असे काहीही केले जाणार नाही, असे डॉ. पवार म्हणाल्या.

Dr. Bharti Pawar
Dada Bhuse News : दादा भुसेंची सूचना नेत्यांनी अव्हेरली, गिरीश महाजन यांनी पाळली!

त्या पुढे म्हणाल्या, केंद्र सरकारने एक आदेश काढला आहे. त्यात नेपाळमधून टोमॅटो आयात करण्यास परवानगी दिलेली आहे. प्रामुख्याने दक्षिणेतील राज्यांमध्ये टोमॅटो नसल्याने ही परवानगी देण्यात आलेली आहे. केवळ नेपाळमधूनचं ही परवनागी आहे. मात्र, याबाबतची सक्ती केलेली नाही. इतर राज्यांमधून टोमॅटो मिळत असल्यास तो घ्यावा असे सांगितले आहे. यामध्ये कांदा समाविष्ट नाही, शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com