MLC Election : अजितदादांचं धक्कातंत्र : चर्चेतील नावे मागे टाकत काढला हुकमाचा एक्का; विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खोडके हे अमरावतीचे असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. काही काळ त्यांनी अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केल्याचे सांगितले जाते. संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके याही अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत.

संजय खोडके हे अनेक वर्षांसोबत अजित पवार यांच्यासोबत आहेत. अमरावती जिल्ह्यातील राजकारणात संजय खोडके यांच्‍या गटाचे वर्चस्‍व आहे. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या 2004 मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आमदार होत्या. 2009 मध्ये अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये खोडके हे आधी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला.

Ajit Pawar
Chandrakant Raghuwanshi: विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अमरावतीमध्ये उमेदवार नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीतून सुलभा खोडके यांना आयात करून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या सुनील देशमुख यांचा पराभव करत सुलभा खोडके विजयी झाल्या होत्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादीने प्रवेशानंतर अवघ्या 10 मिनिटात उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या.

Ajit Pawar
BJP Politics : विधानसभेला बंडखोरीचा इशारा अन् आता विधानपरिषदेत संधी! अमित शहांनी दिल्लीला बोलावून समजूत काढलेले दादाराव केचे कोण?

आता संजय खोडके यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात अजित पवार आणि राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी अमरावती आणि पश्चिम विदर्भामध्ये राष्ट्र्वादीची फारशी ताकद नव्हती. पण भाजप आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात आता अजित पवार ताकद वाढवताना दिसत आहेत.

चर्चेतील नावे मागे टाकत दिली उमेदवारी :

राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा होती. यात झिशान सिद्दकी, संजय दौंड, उमेश पाटील, संजय शिंदे, दिपक मानकर, संग्राम कोते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते असे सांगितले जात होते. मात्र ही चर्चेतील नावे मागे टाकत अजित पवार यांनी संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे. ते आज (17 मार्च) दुपारी अर्ज भरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com