Chhagan Bhujbal : बीडमध्ये भाजपवर धो धो बरसले, येवल्यात येताच भुजबळ म्हणाले.. सांगा ना काय चुकलं माझं?

Chhagan Bhujbal On OBC Reservation : छगन भुजबळ यांनी काल ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. ओबीसी डीएनए म्हणणाऱ्यांनी जीआर काढला आणि ओबीसींशी दगाफटका केल्याचा आरोप त्यांनी केला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी काल बीड येथील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक होत भाजप'ला सुद्दा लक्ष्य केलं. भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं म्हणणाऱ्यांकडून दगाफटका झाल्याचा आरोप भुजबळांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

भाजपने आपल्या नेत्यांना आवर घालावी असा इशारा बीडच्या सभेत भुजबळांनी दिला. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही त्यांनी जहरी टीका केली. विखे आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात विखार पसरवून गेला असं भुजबळ म्हणाले. भुजबळांनी ओबीसी-मराठा आरक्षणाच्या वादावरुन आपल्याच सरकारला दिलेल्या या घरच्या आहेराची राजकीय वर्तुळात सध्या खमंग चर्चा सुरु आहे.

यासंदर्भात भुजबळांनी शनिवारी मतदारसंघात येवला येथे आल्यावर पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसींनी फार मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे महायुती सत्तेत आली. त्यात बीजेपीने तर सांगितलं की, आमचा डीएनए ओबीसी आहे. तरीही तुम्ही अशा रितीने जीआर काढले. त्यावर आम्ही शांतपणे कोर्टात लढतो आहोत. अशावेळी परत परत विखे पाटील यांनी तिथे जाऊन ओबीसींना नाराज करणं...मग ओबीसी काय म्हणतील. उद्या त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर झाला तर काय होईल? देवेंद्रजी तुम्ही आपले मताधिक्य राखण्यात कमी पडाल असं भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Nashik News : नाशिक जिल्ह्याचा दिल्लीमध्ये डंका ! राज्यातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल राष्ट्रीय सन्मान

बीडच्या सभेत मी हेच तर सांगितलं. काय चुकलं माझं? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, भाजपला जर आपली पूर्वीची ताकद कायम ठेवायची असेल तर सगळ्यांनाच बरोबर घेऊन वाट काढावी लागणार आहे. असे जखमेवर मीट चोळण्याचे काम तुम्ही करु नका हे मला म्हणायचे आहे असं भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Girish Mahajan : नाशिकमध्ये इमारत पाडताना मंदिराचे नुकसान, गिरीश महाजनांनी तिथे जाऊन मागितली माफी

दरम्यान भुजबळांनी यावेळी ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही परत हल्लाबोल केला. भुजबळ म्हणाले काल आपण जो व्हिडीओ दाखवला तो सगळीकडे व्हायरल होतो आहे. जरांगे यांच्या शेजारी बसून त्यात वडेट्टीवर सांगताय की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहीजे. आणि इकडे म्हणतात ओबीसीचे संरक्षण करायचं..त्यासाठी मोर्चा काढता. मग हे दबावापोटी चालू आहे का तुमचं. तुम्ही सातत्य ठेवा ना, का धरसोड करताय..त्यातच आम्हाला राजकारण दिसतंय असं भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com