Nashik News : नाशिक जिल्ह्याचा दिल्लीमध्ये डंका ! राज्यातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल राष्ट्रीय सन्मान

Nashik district honoured under Adikarmyogi Abhiyan : 'आदीकर्मयोगी अभियान' अंतर्गत राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ले येथे गौरविण्यात आले.
Omkar Pawar, Chief Executive Officer of the Zilla Parishad, accepted the honor of Nashik District.
Omkar Pawar, Chief Executive Officer of the Zilla Parishad, accepted the honor of Nashik District.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : 'आदीकर्मयोगी अभियान' अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्ह्याला गौरविण्यात आले. हा सन्मान मा. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे (दि. १७) प्रदान करण्यात आला.

आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले असून, या सामूहिक प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा सन्मान स्वीकारला. यावेळी प्रकल्प अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, प्रकल्प अधिकारी (कळवण) ए. के. नरेश, सहायक प्रकल्प अधिकारी हर्षवर्धन नाईक आणि जिल्हा व्यवस्थापक (पेसा) राकेश वाघ उपस्थित होते.

Omkar Pawar, Chief Executive Officer of the Zilla Parishad, accepted the honor of Nashik District.
Girish Mahajan : नाशिकमध्ये इमारत पाडताना मंदिराचे नुकसान, गिरीश महाजनांनी तिथे जाऊन मागितली माफी

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रापंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी केलेल्या विशेष कामगिरीबरोबरच सर्व तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) तसेच ASSK, RGSA आणि PESA टीम यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.

यासोबतच जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रापंचायत प्रतिनिधी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली तसेच सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Omkar Pawar, Chief Executive Officer of the Zilla Parishad, accepted the honor of Nashik District.
Nashik BJP : भाजपच्या 'त्या' दोन माजी नगरसेवकांची यंदाची दिवाळी 'कोठडीतच', न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

हा सन्मान नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्नांचा परिणाम आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन व ग्रामपंचायत यांनी एकसंघपणे कार्य केल्यानेच हा राष्ट्रीय दर्जाचा सन्मान मिळवता आला. आदीकर्मयोगी अभियानाच्या माध्यमातून पेसा क्षेत्रातील ग्रामविकासात नावीन्य, पारदर्शकता जनसहभाग यांचा नवा आदर्श नाशिक जिल्ह्याने घालून दिला आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली.

काय आहे हे अभियान?

आदी कर्मयोगी अभियान हे एक सरकारी अभियान असून ते आदिवासी समुदायाला आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आदिवासी समुदायांमध्ये तळागाळातील नेतृत्व विकसित करणे, त्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आहे. हे अभियान 'विकसित भारत @2047' या ध्येयाचा एक भाग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com