Girish Mahajan News : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना ईडी कारवाईत दिलासा मिळाला. न्यायालयाने त्यांची आरोपातून सुटका केली. आता या प्रकरणात भाजप नेते चर्चेत आले आहेत.
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ईडीने मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणात तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असलेल्या भुजबळ यांना अटक झाली होती. त्यामुळे सव्वा दोन वर्ष त्यांना कारागृहात राहावे लागले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी अनेक आरोप केले होते. यामध्ये मोठा घोटाळा आणि हवाला द्वारे व्यवहार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. यामुळे कारवाई केली होती.
न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत भुजबळ यांच्यावरील कारवाई अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या आरोपांबाबत पुन्हा एकदा चर्चा होत आहे. भुजबळ समर्थकांनी या प्रकरणी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. नांदेड येथे गुरुतेक बहादूर स्मृति कार्यक्रमानिमित्त भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी भुजबळ प्रकरणावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मंत्री महाजन यांनी अतिशय निर्विकारपणे आपले भाष्य केले.
मंत्री महाजन म्हणाले, न्यायालयाने त्यांची सुटका केली. चौकशी झाली आणि मुक्तता झाली. हे काही पहिल्यांदाच होत आहे असे नाही. जेलमध्ये गेलेली माणसे दोशी असतातच असे नव्हे. कारवाई केल्यानंतर चौकशी होत असते. चौकशी झाल्यावर त्यात अनेक जण निर्दोष सुटतात. असे अनेक प्रकरणांमध्ये झालेले दिसते. भुजबळ यांच्याबाबत देखील चौकशीत काही निष्पन्न झाले नसेल, असे महाजन म्हणाले.
मुंबईच्या महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात राजकीय चढाओढ आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरबोडी केली जात आहे. पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिंदे राज ठाकरे यांना भेटले हे चांगलेच झाले. आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे वातावरण निवळले आहे. परस्परांतील संबंध चांगले झाले आहेत.
मुंबईचा महापौर मात्र भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचाच होईल असे महाजन यांनी ठामपणे सांगितले. भाजपला एवढ्या जागा मिळाल्या आहेत. असे असताना अन्य कोणाचा महापौर कसं काय होऊ शकतो? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.