Maratha Arakshan News
Maratha Arakshan NewsSarkarnama

Maratha Arakshan News : आरक्षणाची धग बीडमध्ये कायम; बस जाळली, जिल्हाभर चक्काजाम !

Beed Maratha Arakshan Protest : पिट्टी नायगाव येथील उपोषणालाही पाच दिवस होत आहेत.
Published on

Beed News : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटे या गावात सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा म्हणून बीड जिल्ह्यात आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. आज गुरुवारी मध्यरात्री गेवराईत बस जाळली आहे. तर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये चक्काजाम सुरु आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनाने आंदोलन सुरु आहे. (Latest Marathi News)

Maratha Arakshan News
Dahi Handi 2023 : दहीहंडीत 'प्रचारा'चे थर ; शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंकडून 'निष्ठावंतां'ची दहीहंडी ; यंदा प्रथमच लोकलमधून प्रक्षेपण..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या मराठा समाज बांधवांवरील लाठीहल्ल्याचे सर्वप्रथम पडसाद बीड जिल्ह्यात उमटले होते. लाठीमाराचा निषेध व आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात सहा दिवसांपासून डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथे उपोषण सुरु आहे.

पिट्टी नायगाव येथील उपोषणालाही पाच दिवस होत आहेत. कारी (ता. धारुर) येथे साखळी उपोषण सुरु आहे. तर रोज दोन - तीन गावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची अत्यंयात्रा काढली जात आहे.

Maratha Arakshan News
NCP MLA Threatened: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला टॅक्सी चालकाकडून धमकी

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाने चक्काजामची हाक दिली आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे ठिकाण व मोठ्या बाजारपेठांच्या गावांतील रस्त्यांवर आंदोलन सुरु आहे. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात आहे. सकाळी १० वाजल्यापासून आंदोलनामुळे जिल्ह्यात वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दरम्यान, मराठा समाजातील तरुण मुंडन करुन सरकारचा निषेधही करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com