Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश होता. मंत्रिपदापासून डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली होती. मात्र त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे भुजबळांचा मंत्रिपदासाठा संघर्ष अखेर संपला आहे.
मंत्रिपद मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना भुजबळांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली होती आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाच नाही सांगितलं, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला आहे. मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केल्याचे भुजबळ म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले, मी मंत्री झालो याचा माझ्या पेक्षा जास्त आनंद तुम्हा सगळ्यांना झाला. हा साप शिडीचा खेळ आहे. थोडं वर गेलं की खाली देखील येतं. चालूच असतं, त्याला कोण काय करणार. कधीकधी अशा गोष्टी पण घडतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. नाशिकमध्ये मला विशेष प्रेम दिलं जात. मी नाशिकच्या लासलगाव, येवला या मतदार संघातून निवडून येतो. मागील काळात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं.
आगामी निवडणुकांबद्दल बोलताना, आता सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढायची आहे. अजितदादांनी सुद्धा सांगितलं आहे की, आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाणार आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन महानगर पालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीत सगळ्यांना संधी द्यावी लागेल, पडला तरी चालेल पण तो घटक आपला आहे. आम्ही जेलमध्ये अडकलो होतो तेव्हा देखील आत बसून आपले लोक सभापती केले. पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान छगन भुजबळांच्या एन्ट्रीने नाशिक जिल्ह्यातील राजकारण पुरते बदलले आहे. पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भुजबळांची एन्ट्री झाली आहे. शिवसेनेचे दादा भुसे व भाजपचे गिरीश महाजन यांच्यात पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच होती. आता भुजबळांमुळे पालकमंत्रीपदाचा तिढा वाढला असताना भुजबळांनी त्यावरुन केलेलं वक्तव्य देखील चर्चेत आलं आहे. मी पालकमंत्री नसलो तरी काम करण्याची माझी तयारी आहे, मी पालकमंत्री असलो नसलो तरी काही फरक पडणार नाही. मी नाशिकचा बालक आहे, पालक नसलो तर काय झालं? पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असं भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.