Chhagan Bhujbal : गिरीश महाजनांनी स्वतः हात देऊन वर घेतलं, 'आमच्यातील अबोला मीडियाने तयार केलेला चित्रपट', भुजबळांनी त्या चर्चा फेटाळल्या...

Chhagan Bhujbal On Girish Mahajan 'महाजन-भुजबळ अबोला' हा मीडियाने तयार केलेला चित्रपट असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते येवल्यात पत्रकारांशी बोलत होते. दोघांमधील अबोल्याचा त्यांनी स्पष्ट इन्कार केला.

Chhagan Bhujbal, Girish Mahajan
Chhagan Bhujbal, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमधील खड्ड्यांवरुन मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी नाशिककडे लक्ष द्यावं, जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही.  यापूर्वी कधीही इतकं बेकार नाशिक बघितलं नाही. शहर वाऱ्यावर सोडलंय का असा सवाल करत कुंभमेळामंत्र्यांनी लक्ष द्यावं असं भुजबळांनी सुनावलं होतं. पालिका प्रशासन व कुंभमेळा प्राधिकरणालाही भुजबळांनी खडेबोल सुनावले होते.

त्यानंतर शहरातील एका सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ व मंत्री गिरीश महाजन दोघेही एकाच मंचावर पाहायला मिळाले. मात्र, एकाचमंचावर असूनही दोघांमध्ये अबोला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, येवला येथे पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी दोघांमध्ये अबोला असल्याच्या या चर्चा फेटाळल्या आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अबोला असल्याच्या चर्चेचा स्पष्ट इन्कार केला. महाजन-भुजबळ अबोला हा केवळ माध्यमांनी तयार केलेला चित्रपट असल्याचे सांगत त्यांनी दोघांमध्ये कोणताही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.


Chhagan Bhujbal, Girish Mahajan
Chhagan Bhujbal : नाशिक शहर वाऱ्यावर सोडलंय का? भुजबळ कुंभमेळा मंत्र्यांपासून आयुक्तांपर्यंत सगळ्यांवर संतापले, फडणवीसांसमोर मांडणार मुद्दा

नाशिक येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यात झालेल्या प्रसंगाचा उल्लेख करताना, कार्यक्रमात व्यासपीठावर जाताना गिरीश महाजन यांनी स्वतः हात देऊन वर घेतले. भाषणावेळी प्रत्येकजण आपले भाषण ऐकत किंवा पुढे काय बोलायचे याचा विचार करत असतो. त्यामुळे अबोल्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय बीडच्या पालकमंत्री व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या कथित शाब्दिक चकमकीवर बोलताना, बैठकीत मतभेद होणे स्वाभाविक असून त्याला भांडण म्हणता येणार नाही, असं भुजबळ म्हणाले.


Chhagan Bhujbal, Girish Mahajan
Chhagan Bhujbal : ...तर लाठीचार्ज, देशभर संताप हे टळलं असतं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या कथित राजीनाम्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना, मंत्रिपदाबाबतचा निर्णय हा पक्षाचे अध्यक्ष घेत असतात, तो त्यांचा अधिकार असल्याचे सांगत सध्या अशा कोणत्याही घडामोडी घडतील असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय शिरसाट, बच्चू कडू, अभिजित दीपके आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित चर्चांबाबत माहिती नसल्याचे सांगत त्यांनी भाष्य टाळले. तसेच 'सामना' अग्रलेखावरील प्रश्नालाही प्रत्येक माध्यम आपापल्या बातम्या प्रकाशित करत असते, त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे सांगत उत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com