Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ म्हणतात, मी खूप बिझी आहे!

Chhagan Bhujbal says, I am very busy, no time for displeasure-छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी उत्सुक असून हे पद नसल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री व्हायचे आहे. मंत्रीमंडळात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नऊ मंत्री विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री होण्यास उत्सुक आहेत. (NCP`s Newly joined minister eager to be a Guardian Ministers at various districts)

यासंदर्भात शनिवारी नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रीया दिली. मला नाराजी व्यक्त करायला अजिबात वेळ नाही, असे सांगून त्यांनी या प्रश्नावर वेळ मारून नेली.

Chhagan Bhujbal
Shivsena News : महापालिकेची सत्ता देऊनही फडणवीसांनी विकास केला नाही!

राज्याच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाच्या सर्व नऊ मंत्र्यांना आपल्या जिल्ह्याची सर्व सुत्रे आपल्या हाती हवी आहेत. त्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनात ही नाराजी प्रकटली होती.

याबाबत श्री भुजबळ यांना तुम्ही नाराज आहात का?, असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, माझ्याकडे इतके काम आहे, कि नाराजी व्यक्त करायला देखील वेळ नाही. त्यामुळे पालकमंत्री बदलणार कि नाही याबाबत मला काही माहिती नाही. पालकमंत्री ठरविण्याचे काम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री करतील. मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा ही देखील अफवा असल्याचा दावा त्यांनी केला.

Chhagan Bhujbal
NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, अजित पवार गटाने.. ; रोहित पवारांचं 'सूचक' विधान!

काही दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री बदलाच्या तसेच राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा आहेत. त्या चर्चेच्या अनुशंगाने माध्यमांशी आज नाशिक मध्ये संवाद साधताना भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, राज्यात महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाला विस्ताराचा तसेच प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे.

मुख्यमंत्री बदलाबाबत शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वांरवार चर्चा होत आहे. यावर बोलण्यास भुजबळांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कायम राहणार असून या अफवा असल्याचा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com