Chhagan Bhujbal : अजितदादांचा एकदाही नाही पण भुजबळांचा दोन ते तीन वेळा आला योग, मुख्यमंत्रीपदावरुन नेमकं काय म्हणाले?

After Ajit Pawar's CM remarks, Chhagan Bhujbal issues a bold statement : मलाही कित्येक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे. पण तसा योग कुठेही जुळून आलेला नाही अशा भावना एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Chhagan Bhujbal & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महिलांना मुख्यमंत्री पदावर संधी मिळाली पाहीजे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावा असे सर्वांना वाटते. परंतु अद्याप तसे शक्य झालेले नाही. मलाही कित्येक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे. पण तसा योग कुठेही जुळून आलेला नाही अशा भावना एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी देखील यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा योग होता. तो येऊन गेला. काँग्रेस मधून जाताना देखील तुम्ही जाऊ नका तुम्हाला मुख्यमंत्री करतो असे सांगितले होते. तरी पण मी शरद पवार यांच्या सोबत गेलो. मुख्यमंत्री होण्याची इच्छा सर्वांनी धरायला हरकत नाही. राजकारणात सगळे अपेक्षा घेऊनच येत असतात, मेहनत करावी योग नक्की येईल अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Sharad Pawar : काकांना पुतण्याच्या हातचा सत्कारही नकोसा... शरद पवारांनी अजितदादांच्या सोहळ्याला जाणं टाळलं !

भुजबळांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं. जातनिहाय जनगणनेवरही मत मांडलं. समता परिषद निर्माण झाल्यानंतर आम्ही अनेक रॅली काढल्या. त्यात आमची पहिली मागणी जातिनिहाय जनगणना करा अशीच होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनगणना झाली मात्र जातिनिहाय जनगणना झालेली नाही. 52 टक्के ओबीसी समाज आहे म्हणून आम्हाला 27 टक्के आरक्षण मिळाल्याचे भुजबळ म्हणाले.

लाडकी बहिण योजनेवर बोलताना भुजबळ म्हणाले, दलित व आदिवासी समाजासाठी वेगळे निधी असतात. सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे वेगवेगळ्या मार्गांनी गोळा करून पूर्तता करण्यात येत आहे. हळूहळू जसे राज्याचे उत्पन्न वाढेल तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र निधी उभा राहील.

Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Nashik News : पहलगाम हल्ल्यानंतर भीतीचे सावट, नाशिकमधील काश्मिरी नागरिक झाले गायब

...तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते

दरम्यान संजय राऊत यांनी देखील यासंदर्भात मत व्यक्त करताना छगन भुजबळ हे शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते असे म्हटले आहे. तसेच अजित पवार भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत असा टोला राऊतांनी लगावला. त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल असंही त्यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com