Sanjay Raut News : ‘छगन भुजबळांना माहितीच नाही, ते धादांत खोटे बोलत आहेत’

Chhagan Bhujbal telling lie for protection from ED-छगन भुजबळ आणि दादा भुसे हे पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Raut On Chhagan Bhujbal : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा छगन भुजबळ नुकतेच तुरुंगातून बाहेर आले होते. त्यांना काहीही माहिती नाही. ते धादांत खोटे बोलत आहेत, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut moot the points of Chhagan Bhujbal on Sharad Pawar)

शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आज नाशिक (Nashik) येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) तसेच दादा भुसे (Dada bhuse) या दोन्ही मंत्र्यांची राजीनामे घेतले पाहिजेत, असे सांगितले.

Sanjay Raut
Trible Reservation : आमदारांनो राजीनामे देऊन घरी बसा!

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी नुकतेच शरद पवार यांना भाजपशी युती करायची होती, असे विधान केले होते. त्याबाबत खासदार राऊत यांनी भुजबळ खोटे बोलत आहेत, असे ठाम विधान केले.

ते म्हणाले, भुजबळ खोटे बोलत आहेत. महाविकास आघाडी सरकारची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा भुजबळ तुरुंगात होते. निवडणुकीचा निकाल लागला, त्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार तयार करून राज्याला एक चांगले सरकार द्यायचे हे शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांचे ठरले होते. महाविकास आघाडी सरकारबाबत भुजबळ काय बोलतात, याला काहीही महत्त्व नाही. त्यांना ईडीपासून संरक्षण हवं होतं, मंत्रिपददेखील हवं होतं म्हणून ते सरकारबरोबर गेले. २०२४ मध्ये भुजबळ कुठे असतील, हे कोणालाही सांगता येणार नाही.

नाशिक येथील ड्रग्ज प्रकरणावर त्यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दाद भुसे यांच्यावरील आरोपांचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ड्रग्ज प्रकरणामध्ये सर्वात आधी नाशिकचे पालकमंत्री भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. भुसे हे पुराव्यांशी छेडछाड करीत आहेत. आमच्याकडून गेलेले आणि आत्ताच्या सरकारमधील काही मंत्र्यांचादेखील या प्रकरणात सहभाग असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

Sanjay Raut
Drug Mafia Lalit Patil : धनुष्यबाण शिंदे यांनी पळवला...अचूक बाण मात्र अंधारे यांनीच मारला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com