Devendra Fadnavis : ..तर आम्ही मनातल्या मनात करु, चक्रधर स्वामी 'अवतार दिन'साजरा करण्यावर फडणवीस ठाम

Devendra Fadnavis On Chakradhar Swami Avatar Day : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये 38 व्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशानाचे उद्घाटन झाले.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Chief Minister Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : 38 व्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन नाशिकमध्ये शनिवारी (ता.२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नाशिकच्या छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील जय शंकर फेस्टिव्हल लॉन्समध्ये हे अधिवेशन होत आहे.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानुभव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचा प्रकटदिन अवतार दिन म्हणून साजरा करण्याच्या सरकारच्या निर्णयावर महत्वाचे व स्पष्ट शब्दात भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामींचा प्रकटदिन भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस सरकारने राज्य भरात सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अवतार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, परंतु सरकारच्या या निर्णयाला काहींनी विरोध केला आहे. यात काही वाद निर्माण झाले आहेत. काहींचे म्हणणे आहे की, अवतरण दिवस म्हणजे ईश्वराचा अवतार आहे. मग तो तुम्ही कसा साजरा करता. महापुरुषांबाबत तुम्ही असे कसे करता असे काही जणांचे म्हणणे आहे. परंतु आम्ही चक्रधर स्वामींना मानतो म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो करायचा की नाही ते पंथाने ठरवायचे आहे असं फडणवीस म्हणाले.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Devyani Farande : महापालिकेला फरांदे ताईंचा झटका दाखवावा लागेल, निधी न दिल्याने आमदार संतापल्या..

फडणवीस म्हणाले, आम्ही आता कमिटी तयार केली आहे. कमिटी जे सांगेल ते आम्ही करु, कमिटी म्हणाली करा तर आम्ही शंभर टक्के करु कारण आम्हाला करायचाच आहे. आणि कमिटी म्हणाली नको करु तर आम्ही मनातल्या मनात करु..करणार तर आम्ही आहोतच असे फडणवीसांनी स्पष्ट केलं.

पथांच्या इतर निर्णयांबाबत फडणवीस म्हणाले, अशा प्रकारचे जे विषय असतात त्यात आपल्याला फारसे वाद करायचे नसतात. धार्मिक, आध्यात्मिक विषयात सरकारचे काम हे निर्णय करणे नसते. तुम्ही केलेला निर्णय फॉलो करणे सरकारचे काम असते. त्यामुळे तुम्ही निर्णय करा तुमच्या निर्णयाच्या पाठिमागे सरकार ठाम पणे उभे राहील असं फडणवीस यांनी सांगितलं.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Nashik ZP : आमदार कांदेंकडून ठेकेदार पुतण्याचा पर्दाफाश, जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याने देवेंद्र कांदेंवर गुन्हा दाखल

आम्ही सगळे महानुभव पथांच्या पाठिशी आहोत. मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पंथासाठी कार्य करण्याची संधी लाभली. केवळ देशभरात नाही तर अफगानीस्तान पर्यंत महानुभव पंथ पसरला आहे. देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो तरी महानुभव पंथाची लोक आपल्याला भेटतात. पण दुर्देवाने कधीच या पंथाची दखल कोणी घेतली नाही. मात्र ती संधी मला मिळाली असं फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com