Ahmednagar News: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी नगर जिल्हा दौऱ्यावर असून प्रवारानगर येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास उपस्थित राहण्यापूर्वी राजनाथ सिंह यांचे शिर्डी जवळील काकडी विमानतळावर दुपारी एक वाजता आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यासह आदी उपस्थित होते.
यानंतर राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी शिर्डीत साई समाधी मंदिरात जाऊन साई समाधीचे आणि साई मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी राजनाथ सिंह यांच्या हस्ते साईंची आरती करण्यात आली. आशिया खंडामध्ये सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 134 व्या जयंती सोहळ्यानिमित्ताने राजनाथ सिंह यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
दरवर्षी पद्मश्री विखे पाटील यांच्या नावाने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तसेच कला पुरस्कार देण्यात येतो. या कार्यक्रमाचे विखे परिवाराच्यावतीने आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना आमंत्रित केले जाते. गेल्या वर्षी याच साहित्य पुरस्कार सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रित करण्यात आले होते.
साहित्य सोहळा पुरस्काराच्या निमित्ताने विखे पाटलांच्या लोणी आणि प्रवारानगर या ठिकाणी मोठी जयत्त तयारी करण्यात आलेली आहे. अंमळनेर इथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभने पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. प्रवरानगर येथील स्वर्गीय गाडगीळ सभागृहामध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडणार आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.