Nashik Rain update : नाशिकला ढगफुटीच्या इशाऱ्याने यंत्रणा अलर्ट; त्र्यंबकला रात्रभरात १२५ मीमी पाऊस : गिरीश महाजनांची झोप उडाली, सकाळी मात्र दिलासा

Cloudburst warning in Nashik district: शहरात रात्रभर यंत्रणा अलर्ट, पावसाचा जोर, त्र्यंबकेश्वर शहर गोदावरीच्या आणि पावसाच्या पाण्याखाली गेले, रस्त्यांवर पावसामुळे पुर!
Nashik Heavy Rain: Trimbakeshwar Gets 125 mm Rain, Girish Mahajan on Alert After Cloudburst Warning
Nashik Heavy Rain: Trimbakeshwar Gets 125 mm Rain, Girish Mahajan on Alert After Cloudburst WarningSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan reviews Nashik rain situation: मुसळधार पावसाने राज्यभर अलर्ट देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांसह त्यांनी मंत्रालयात नियंत्रण कक्षात हजर राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

नाशिक शहर व जिल्ह्यात राऊभर पाऊस झाला. पुणे आणि कोकणातील वाहतूक पावसामुळे विस्कळीत झाली. नाशिकला ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. राज्यातील या अलर्ट व्यवस्थेमुळे सबंध प्रशासन आणि मंत्रीही दक्ष होते. या स्थितीमुळे मंत्री गिरीश महाजन गेल्या दोन-तीन दिवसापासून पुरेशी झोप घेऊ शकले नाही.

त्र्यंबकेश्वर आणि शहरात रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगफुटीचा अलर्ट असल्याने आपत्कालीन यंत्रणा सतर्क होती. त्र्यंबकेश्वर शहरात १२५ मीमी पाऊस झाला. परिसर पावसाच्या पाण्याखाली गेला होता. त्यामुळे गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

Nashik Heavy Rain: Trimbakeshwar Gets 125 mm Rain, Girish Mahajan on Alert After Cloudburst Warning
Nashik Rain Alert : आभाळ फाटणार, नाशिकमध्ये उद्या ढगफुटीचा इशारा, CM देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशीही नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. दोन वक्रकार गेटमधून तीन हजार 228 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Nashik Heavy Rain: Trimbakeshwar Gets 125 mm Rain, Girish Mahajan on Alert After Cloudburst Warning
Maharashtra Politics Live Update : अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या अंतरिम महासचिवपदी माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची नियुक्ती

पावसाच्या पाण्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याचा विसर्गात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निफाडचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी रात्री सायखेडा, चांदोरी, करंजगाव, शिंगवे या गावांना भेट देऊन सतर्क राहण्याचा दिला इशारा दिला आहे.

ढगफुटीचा अलर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिला होता. त्यामुळे नाशिकमध्ये खबरदारीची उपायोजना करण्यात आली आहे. शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वनी देवस्थान बंद ठेवण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाने या परिसराची वाहतूक बंद ठेवली होती.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून भाबडभारी घाट अग मी 48 तासासाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सुविधांसाठी पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागला. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर शहरात पाणी भरले होते. ब्रह्मगिरीवर जोरदार पाऊस असल्याने सबंध परिसरात पावसाच्या पाण्याचा वेढा होता.

इगतपुरी परिसरात कालपासूनच दिवसभर जोरदार पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे दारणा, कडवा तसेच अन्य नद्यांना पूर आला. शेती पाण्याखाली गेली होती. अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अचानक आलेल्या आणि कमी कालावधीत प्रचंड पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र सकाळी पावसाचे ढग सूरत शहराकडे वळाल्याच्या बातमीने नाशिकच्या प्रशासनाला दिलासा मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com