MNS Nandurbar News : ‘मनसे’ने खाते उघडले, रेखाबाई माळी झाल्या बिनविराेध सरपंच!

Rekhabai Mali has been elected as first Sarpanch of MNS-नंदुरबार जिल्ह्यातील काकर्देच्या सरपंचपदी निवड झाल्याने त्या मनसेच्या पहिल्या सरपंच ठरल्या
Newly elected MNS Sarpanch
Newly elected MNS SarpanchSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News : काकर्दे (नंदुरबार) या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेखाबाई माळी या बिनविरोध सरपंच झाल्या. यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात आपले खाते उघडले आहे. (MNS women elected as village Sarpanch in Nadurbar)

काकर्दे (ता. नंदुरबार)च्या (Nandurbar) सरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) रेखाबाई राकेश माळी यांची बिनविरोध निवड झाली. नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच मनसेच्या महिला (Women) कार्यकर्त्या सरपंचपदी विराजमान झाल्या असून, ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला आहे.

Newly elected MNS Sarpanch
BJP & Shinde Group News: एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल का?

काकर्दे येथील सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवडप्रक्रिया मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात झाली. या वेळी निवडप्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून एन. डी. पानपाटील, सूर्यवंशी व ग्रामसेवक शरद गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

काकर्दे ग्रामपंचायतीची स्थापना १५ मार्च १९५६ ला झाली. ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत. ग्रामपंचायतीची १५ जानेवारी २०२१ ला निवडणूक झाली व २५ फेब्रुवारी २०२१ ला सरपंचपदी निवड झाली. दुसऱ्या टर्मसाठी मंगळवारी निवडप्रक्रियेत रेखाबाई माळी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी पानपाटील यांनी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली.

मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नंदुरबार विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कोकणी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, रायसिंग भिल आणि काकर्देचे उपसरपंच किरण मराठे, ग्रा.पं. सदस्य सुरेखा पाडवी, पुंडलिक मराठे, हिराबाई माळी, वैशाली महाजन, कलाबाई भिल, कांतीलाल ठाकरे, विमलबाई महाजन यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. निवड झाल्यावर त्यांनी जल्लोष केला.

Newly elected MNS Sarpanch
Piyush Goyal News: पीयूष गोयल यांनी अजित पवारांचे म्हणणे धुडकावले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com