नंदुरबार : भाजप (BJP) नगरसेविका ज्योती राजपूत (Jyoti Rajput) यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी (Ratna Raghuwanshi) यांच्या नेतृत्वात कार्य करणार असल्याचे सांगत मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचे स्वागत केले. (BJP Corporator Jyoti Rajput join Shinde group resignation)
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ज्योती राजपूत यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भाजपकडून ज्योती राजपूत यांचे नाव सुचवण्यात आलं होते. त्यानुसार, स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची निवड करण्यात आली होती. शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणार असल्याचे सांगत नगरसेविका ज्योती राजपूत यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे पदाच्या राजीनामा सोपवला.
ज्योती राजपूत यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी कृषीमंत्री दादा भुसे, आमदार संदीपान भुमरे, आमदार संजय राठोड, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.