Vinayak Raut
Vinayak RautSarkarnama

Shivsena News; खेडच्या सभेत प्रतिमाणसी हजार रुपये अन् बिर्याणी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
Published on

नाशिक : (Nashik) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खेड (Konkan) येथे घेतलेल्या उत्तर सभेत प्रतिमाणसी एक हजार रुपये व बिर्याणीचे पाकीट दिल्याचा आरोप खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला. उत्तरे द्यायला वेळ असलेल्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ नाही हे राज्याचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. (CM Eknath Shinde don`t have time to visits frmers)

Vinayak Raut
Ravikant Tupkar : तुपकर गरजले, म्हणाले ‘त्या’ राजकीय गढ्या उद्ध्वस्त करू...

मालेगाव येथे येत्या रविवारी (ता. २६) उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी खासदार राऊत सोमवारी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना भवन येथे माध्यमांशी संवाद साधला.

खासदार राऊत म्हणाले, की अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांच्या घास हिरावला गेला. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही. सिन्नरच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर टक्के मदतीचे आश्वासन दिले.

Vinayak Raut
Sanjay Raut : राहुल कुल यांच्यानंतर आता दादा भुसे राऊतांच्या निशाण्यावर ; म्हणाले 'लवकरच स्फोट...'

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले परंतु अद्याप त्यांच्या बांधावर जाण्यास मंत्र्यांना वेळ नाही. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने भरपाई कधी मिळणार, या विवंचनेत शेतकरी आहे. शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देताना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पुनर्गठन अट टाकली जात आहे.

लाँग मार्चमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांना अर्थसहाय्य नाही. चारही बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. मुख्यमंत्री व मंत्री वेगळ्याच विश्वात रमले आहेत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेड येथील सभेला उत्तर देण्यासाठी यांना सभा घेण्यासाठी वेळ आहे. परंतु शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. यावरून सरकारची शेतकऱ्यांबद्दलच भूमिका समोर येते. मुख्यमंत्र्यांच्या खेड येथील सभेत लोक भाषण सुरू असतानाच उठून गेले.

Vinayak Raut
BJP-Thackeray Politics: फडणवीस-जयसिंघानी प्रकरण तापलं; ठाकरे गटाचा फडणवीसांना थेट इशारा

रत्नागिरी येथून एक हजार रुपये व बिर्याणीचेची पाकिटे दिली गेल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट पंचनाम्याचा अहवाल पाठवून चोवीस तासांत मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बावनकुळेंचे केंद्रीय नेतृत्वाचे बोल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ४८ जागा देण्याचे वक्तव्य केले. बावनकुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेचं बोल बोलले असून, शंभर टक्के खरे आहे. भाजपने त्यांना लायकी दाखविल्याची टीका केली. नीलेश राणे यांनी निवडणुकीत उभे राहावे त्यांच्या पराभवाला शिवसेनेच्या शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांच्या द्वेषाची कावीळ झाली असून, भाजपची स्क्रिप्ट ते वाचून दाखवितात.

Vinayak Raut
Old Pension Scheme : कर्मचारी संपात फूट? जुनी पेन्शन संघटना संप सुरू ठेवण्यावर ठाम

जयसिंघानी प्रकरण

वादग्र्सत बुकी जयसिंघानी अटकेसंदर्भात बोलताना त्यांनी पोलिसांचे समर्थन केले. परंतु जयसिंघानी यांचे पाच वर्षांपासून कोणाशी घरोब्याचे संबंध होते, हेदेखील तपासले पाहिजे, अशी पुस्ती जोडतं देवेंद्र व अमृता फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. जयसिंघानी यांच्या सोबतचे उद्धव ठाकरे यांचे फोटो सध्या दाखविले जात आहेत. परंतु जयसिंघानीला ‘मातोश्री’वर आणले. ते सध्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसल्याची टीका त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com