LPG Gas Crisis : राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा; मंत्री छगन भुजबळांनी दिली गुड न्यूज...

Maharashtra Commercial LPG supply : व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा. मंत्री छगन भुजबळ यांनी दिली महत्वाची माहिती.
Chhagan Bhujbal, LPG Gas Crisis,
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : अमेरिका -इस्रायल- इराण यांच्यातील युद्धाचा फटका काहीसा भारतालाही बसत आहे. महाराष्ट्रातही घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही गुडन्यूज कळवली आहे.

युद्दाचा परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच केंद्र शासनाने राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी एलपीजीच्या पुरवठ्यासंदर्भात दिलासादायक निर्णय घेतला आहे.

राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी (Commercial LPG) पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भुजबळांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने २१ मार्च रोजी दिलेल्या सूचनांनुसार, यापूर्वी राज्याला ३० टक्के वाटप मंजूर होते. आता २३ मार्च पासून पुढील आदेश येईपर्यंत आणखी २० टक्के वाटप वाढविण्यात आले असून एकूण गॅस पुरवठा पूर्व-संकट पातळीच्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.

Chhagan Bhujbal, LPG Gas Crisis,
Ashok kharat land scam : अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; उपजिल्हाधिकाऱ्याच्या बायकोचं कनेक्शन आलं समोर...

या अतिरिक्त २० टक्के वाटपात हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया व दुग्धव्यवसाय यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स आणि स्थलांतरित मजुरांसाठीच्या योजनांनाही लाभ मिळणार आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, या निर्णयामुळे व्यापारी एलपीजीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल आणि उपहारगृह व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, गॅस मिळविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना तेल विपणन कंपन्यांकडे (OMCs) नोंदणी करणे आणि पीएनजी (PNG) साठी अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील खाद्यव्यवसायाला मोठा दिलासा मिळणार असून पुरवठा साखळी अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chhagan Bhujbal, LPG Gas Crisis,
CM Fadnavis On Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले, 'सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे...'

दरम्यान, केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर राज्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, यासारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेल व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू होण्याची शक्यता आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com