

Maharashtra political controversy : काँग्रेसच्या राष्ट्रीय कोअर कमितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.
थोरातांची मंत्री पाटील यांच्या भेटीवर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या भेटीमागील कारण काय, माजी मंत्री थोरात यांनी यावर प्रतिक्रिया देता म्हटले, 'होय, चंद्रकांतदादांना भेटलो'.
काँग्रेस बाळासाहेब थोरात म्हणाले, "होय, भाजपचे (BJP) चंद्रकांतदादांना भेटलो. माझ्या शैक्षणिक संस्था आहे. अभियांत्रिकी काॅलेजचे काही प्रश्न होते. प्राचार्य, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. याबाबतील काही प्रश्न सोडवायचे होते, यासाठी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो." विद्यार्थी हा जनसामान्यांशी निगडीत आहे. त्यामुळे या भेटीमागे काही राजकारण असायचे कारण नाही. चंद्रकांतदादा याबाबत कधीही राजकारण करत नाही, असेही थोरात यांनी म्हटलं.
दोन नेते एकत्र आले होते. काही राजकीय चर्चा झालीच असणार! तसंच काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. त्यातील काही जण नाराज आहेत. यावर बोलताना, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिप्रश्न करत, काँगेसमध्ये कुठे नाराजी आहे? आम्ही आहोत. काम करत चाललो आहोत, असे स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी, राहुल गांधींनी अगोदरच सांगितले होते की, हे संकट येऊ शकते. परंतु निवडणुका चालू आहेत. तिथं प्रचंड धुमाकूळ केला. इंधन प्रचंड वापरले. आता काटकसर सांगत आहेत. सुरवात स्वतःपासून केली पाहिजे, याची आठवण थोरातांनी मोदींना करून दिली.
पंतप्रधान मोदी फिरतच आहे. पण त्यांच्या भाजपच्या नगरसेवकांचे, कार्यकर्त्यांचे ताफे कसे फिरत आहेत, याकडे बाळासाहेब थोरातांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी अगोदर उधळपट्टी केली आहे आणि आता हे काटकसर करायला सांगत आहेत, असा घणाघात थोरातांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.