Ladki Bahin Yojana Maharashtra : 'या' लाडक्या बहि‍णींचा लाभ फेब्रुवारीपासून बंद होणार

Sanjay Gandhi Destitute Shravan Bal Yojana CM Ladki Bahin Yojana February 2025 : लाडकी बहीण योजनेंच्या निकषावर वेगवेगळी विधानंसमोर येत असतानाच पडताळणीनंतर या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे किती लाडक्या बहि‍णींची ओवाळणी बंद होणार किंवा काढून घेतली जाणार, याची चर्चा सुरू आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहे.

कोणत्याही एका योजनेचा लाभ घेता येणार असल्याने, लाडक्या बहि‍णींची यामुळे अडचण झाली आहे. फेब्रुवारीपासून संजय गांधी निराधार योजनांची पडताळणी करून, त्यातील एका योजनेचा लाभ बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना (Scheme) राबविण्यात येते. या दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात. परंतु कोणत्याही एका योजनेचा लाभ घेतला असल्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे.

Ladki Bahin Yojana
Supriya Sule : शरद पवार अन् अजित पवारांची 'सहमती एक्सप्रेस'? सुप्रियाताईंनी कोल्हापुरात दिलेली टाळी वाजणार...

यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांच्या याद्यांच्या पडताळणीचे काम वरिष्ठस्तरावरून सुरू झाले आहे. सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या, कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो, असा निकष आहे. तरीही या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता 65 वर्षांपर्यतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या महिला लाभार्थीना यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा, याचे स्वयंघोषणापत्र (प्रतिज्ञापत्र) सरकारकडे सादर करावे लागणार आहे. तसे न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सांगितले जात आहे.

Ladki Bahin Yojana
Top 10 News : 'आप'च्या मुसक्या आवळणार का?; किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

योजनांतील लाभार्थ्यांची पडताळणी

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बँक पासबुक महसूल विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही दिवसांतच ती पूर्ण होईल. ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत, अशा महिलांची पडताळणी होणार आहे.

...तर अनुदान बंद होणार

दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे संजय गांधी योजनेचे अनुदान बंद होईल. याबाबत फेब्रुवारी महिन्यापासून पडताळणी केली जाणार आहे. कागदपत्रे जमा न केल्यास निराधार महिलांना लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे मिळतात, त्या महिलांनी महसूल विभागाला कागदपत्रांची योग्य माहिती दिली नाही तर त्या महिलांचे अनुदान बंद करणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com