Congress News : राष्ट्रवादीच्या नाशिक अन् दिंडोरीवर काँग्रेसचा दावा; उमेदवारही ठरवले

Nashik Congress : धुळे लोकसभेचा उमेदवार मालेगावचा असावा
Nashik Congress
Nashik Congress Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress on Loksabha Constituency : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर जिल्हा काँग्रेसने दावा ठोकला आहे. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वेळा लढवून यश मिळले नाही. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसनेच घ्यावा, असा आग्रह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

मुंबईत प्रदेश काँग्रेसकडून लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. यात नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आदींनी या मतदारसंघाबाबत माहिती घेत उमेदवारांबाबत चर्चा केली.

दिंडोरीतील (Dindori) बहुतांश विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे (NCP) आहेत. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, २००९ पासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीला विजय मिळविता आला नाही. हे निर्देशनास आणून देत आता हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यावर उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी आदिवासी क्षेत्रातून सक्षम आणि नवीन चेहऱ्यांस उमेदवारी देता येईल, असे सांगण्यात आले.

Nashik Congress
Sunita Dhangar News : सुनीता धनगरांनी १४२ शिक्षकांना बदल्यांसाठी प्रत्येकी ४० हजार मागितल्याची चर्चा

नाशिक लोकसभा (Nashik) मतदारसंघातही राष्ट्रवादीला २०१४ व २०१९ मध्ये यश मिळालेले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ पक्षाकडे घेण्याचा आग्रह करण्यात आला. दरम्यान, नाशिकमधून कुणाला उमदवारी देता येईल, यावर चर्चा झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मतदारसंघ घ्या उमेदवार एकत्रीतपणे ठरवू, असे असे सांगण्यात आले. मात्र, उमेदवारी न केल्यास पक्ष संघटन कसे वाढणार? असा प्रश्न जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी उपस्थित केला.

शेवाळे म्हणाले, "पक्षाचे उमेदवार असल्यास, घरोघरी पक्ष व चिन्ह पोहचता येते. पक्षवाढीसाठी आम्हाला ताकद मिळेल. दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे संघटन होण्यास अडसर येत आहे. पक्ष संघटन वाढावण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत."

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, रमेश कहांडोळे, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, गुणवंत होळकर, अॅड. संदीप गुळवे, वत्सला खैरे, स्वाती जाधव, स्वप्नील पाटील, अनिल पाटील, किशोर कदम यांच्यासह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik Congress
Make Jyoti Mete a minister News : भाजपने दिलेला शब्द पाळावा, डॉ. ज्योती मेटेंना मंत्रिमंडळात घ्यावे..

बाळासाहेब थोरातांनी नाशिकमधून लढावे

नाशिक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा अशी मागणी झाल्यानंतर उमेदवार कोण अशी विचारणा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली. त्यावेळी स्थानिक नावे घेण्यात आली. मात्र, माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उमेदवारी करावी अशी मागणी माजी आमदार कोतवाल यांनी केली. थोरात यांचे नाशिक जिल्ह्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांचा मतदारसंघ शेजारीच असल्याने मोठा फायदा पक्षाला होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे थोरात यांचे नाव पुन्हा नाशिक लोकसभेसाठी चर्चेत आले आहे.

Nashik Congress
MLA Dhanorkar News : धानोरकरांच्या सहकाऱ्यांनी व्हायरल केली पोस्ट, अन् चर्चांना आले उधाण...

धुळ्याचा उमेदवार मालेगावतून द्या

धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule) उमेदवारी देताना आतापर्यंत धुळे जिल्ह्याला प्राधान्य दिलेले आहे. परंतू, यश मिळाले नाही. यंदा मालेगावातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी बैठकीत झाली. धुळ्यासाठी आमदार कुणाल पाटील, डॉ. तुषार शेवाळे, शाम सनेर यांची नावे पुढे आली. त्यावेळी आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे शेवाळे यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी लावून धरली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.