
Chandrashekhar Bavankule news: भारतीय जनता पक्ष कधीही मुस्लिमविरोधी नव्हता. उलटपक्षी आपल्या सत्ताकाळातील ६५ वर्षांत काँग्रेस पक्षानेच मुस्लिमांना ‘कन्फ्यूज’ करीत त्यांचा केवळ मतांसाठी वापर करून घेतला. निवडणुका आल्या, की काँग्रेस पक्ष भाजपबाबत मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत असतो, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. (BJP State President Chandrashekhar Bavankule criticized Congress on Muslim issue)
श्री. बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) आज जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आयएमए सभागृहामध्ये पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा रद्द झाला. त्याचा भाजपला (BJP) काहीही लाभ अथवा नुकसान होईल असे नाही.
संघटनात्मक आढाव्यासाठी ते जळगावच्या दौऱ्यावर होते. जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, उपाध्यक्षा स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
श्री. बावनकळे यांनी राज्यात सुरू असलेल्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. राज्यात आम्ही १५ ते ३० एप्रिल दरम्यान सर्व पदाधिकारी विविध भागात जाऊन बूथ स्तरापर्यंत कार्यकर्ते व नागरिकांना जोडत आहोत. युवा वॉरियर्स, फ्रेंड्स ऑफ मोदीजी अशा विविध उपक्रमांमधून विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी ६० हजार व लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी साडेतीन लाख लोकांना जोडण्याचा प्रयत्न आहे.
मोदीच पुन्हा पंतप्रधान
विरोधकांकडून देशपातळीवर मोट बांधली जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले, की विरोधकांनी कितीही एकत्रित येऊन मोट बांधली, तरी या देशातील जनतेने पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्याचे ठरविले आहे. १३० कोटी जनता हे ठरवते तेव्हा तेच चित्र अंतिम असते.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना मिळून आम्ही राज्यातील सर्व ४८ जागा जिंकू, तसेच विधानसभेच्या २८८ पैकी दोनशेहून अधिक जागांवर आमचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात केवळ लोकसभा व विधानसभेच्याच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रितपणे लढतील. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच जागेवर दोन्ही पक्षांचे सक्षम उमेदवार असल्यास अशा निवडक ठिकाणी आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतील, असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता, आजकाल सकाळी नऊला एक भोंगा सुरू होतो व दिवसभर वाजत राहतो. या संदर्भात आमचीही बाजू समोर यायला हवी, म्हणून या भोंग्याला उत्तर द्यावे लागते. त्यासाठी नेत्यांची गरज नाही. आम्ही आठ प्रवक्ते नेमलेत. ते त्यांना उत्तर देतील, या शब्दांत बावनकुळेंनी राऊतांवर खोचक टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.