Congress Vs BJP: काँग्रेस नेत्यानं काढली भाजपची बुद्धी; म्हणाले, 'आम्ही श्रीरामांना भारताच्या राज्यघटनेत...'

Ayodhya Donation Theft : अयोध्येतील राम मंदिराचा चोरी गेलेला निधी आणि अन्य मौल्यवान वस्तूंचा उपयोग विघातक राजकारणासाठी भाजपने केला असावा असा संशय आहे. आमदार आणि खासदार फोडाफोडी साठी हा निधी वापरला गेला काय याचीही चौकशी करण्याची गरज आहे.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक आहे. यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांची मंगळवारी (ता.7 जुलै) काँग्रेसने अक्षरश: बुद्धी काढली. या नेत्यांच्या आरोपांवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांची व टिकेचा चांगलाच समाचार घेतला. भाजप अयोध्येतील राम मंदिराच्या चोरीबाबत प्रामाणिक नाही, अशी टीका त्यांनी केली.

टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचे नागरिकशास्त्र आणि माहिती अत्यंत कच्ची आहे. काँग्रेसने श्रीरामांना भारताच्या राज्यघटनेत स्थान दिले आहे. श्रीरामाच्या आदर्श कारभाराचे काँग्रेसने आदर म्हणून ते केले, याची माहिती भाजप नेत्यांना आहे काय? असा प्रश्न सपकाळ यांनी केला.

काँग्रेस पक्षाने श्रीराम यांना सदैव सन्मानाचे स्थान दिले आहे. भाजपने श्रीराम आणि मंदिर हा विषय केवळ राजकारणासाठी व स्वार्थासाठी वापरला. युद्धेतील मंदिरात झालेली चोरी आणि हजारो कोटींच्या देणगीचा घोटाळा, हे भाजपच्या अप्रामाणिकपणाचे उदाहरण आहे.

Harshwardhan Sapkal
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या निर्देशानुसार झालेली कारवाई ठरली बेकायदेशीर; हायकोर्टाचा 'गोरस भंडार'ला परवाना बहाल करण्याचा आदेश

अयोध्येतील देणगी आणि सोन्या चांदीच्या विटांच्या चोरीबाबत भाजप हे प्रकरण दडपण्यासाठी सत्तेचा वापर करीत आहे. ही चोरी उघड किस येऊ नये आणि दोषींना संरक्षण देण्याचा त्यांचा आटापिटा सुरू आहे.

देणगी चोरीबाबत नियुक्त केलेली एसआयटी हीच वादग्रस्त आहे. या समितीतील दोन अधिकारी हे मोदी यांचे हस्तक आहेत. हे हस्तक चौकशी प्रामाणिकपणे होऊ देतील का? हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Harshwardhan Sapkal
NCP Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 'एनडीए'त सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण; अमोल मिटकरींचे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

अयोध्येतील राम मंदिराचा चोरी गेलेला निधी आणि अन्य मौल्यवान वस्तूंचा उपयोग विघातक राजकारणासाठी भाजपने केला असावा असा संशय आहे. आमदार आणि खासदार फोडाफोडी साठी हा निधी वापरला गेला काय याचीही चौकशी करण्याची गरज आहे. हा घोटाळा हजारो कोटींचा आहे. त्याची पारदर्शक चौकशी करण्याची गरज आहे. देणगी चोरणाऱ्यांच्या घरावर भाजपचे सरकार बुलडोझर चालवणार काय? असा प्रश्नही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com