NCP Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 'एनडीए'त सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण; अमोल मिटकरींचे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख नेत्यांची भेट आणि चर्चा झाल्याचं बोललं जात आहे
Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख नेत्यांची भेट आणि चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे राजकीय संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी (ता.7 जुलै) ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी हॅशटॅग देत लवकरच नवी वेळ असं म्हटलं आहे.

अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवरील पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी पोस्टमध्ये आदरणीय पवार साहेब यांना भविष्याचं आकलन असल्याची टिप्पणी करत राष्ट्रवादी पक्षात सुरु असलेल्या पडद्यामागच्या राजकीय हालचालींनाच एकप्रकारे बळ दिल्याचं दिसून येत आहे.

मिटकरी पोस्टमध्ये म्हणतात, आज जरी त्यांचा पक्ष काँग्रेस किंवा NDA च्या सोबत जाण्याच्या चर्चेत दिसत असला तरी योग्यवेळी योग्य निर्णय होईल आणि हा महाराष्ट्राला सुखद “पुरोगामी” धक्का असेल. साहेबांच्या पक्षात राजकीय दृष्ट्या समयसुसंगत कुणी नेता नसल्याचे चित्र त्यांना स्पष्ट दिसत असल्याचा दावाही माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Amol Mitkari
Tamilnadu Politics: तामिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट: CM विजय यांना मोठा धक्का; मद्रास उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी केंद्रातील NDAला अतिरिक्त खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या असलेल्या 8 खासदारांच्या संख्याबळाची एनडीएला मोठी गरज पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्या कथित भेटीकडे राजकीय विश्लेषक आणि सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.मात्र, या भेटीबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Amol Mitkari
Beed News : बीडमधील बड्या नेत्याच्या पत्नीची भेसळयुक्त दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी : पुण्यातील पावडर प्लांट चालकाला फोनवरून धमकावलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Prime Minister Modi and Union Home Minister Amit Shah; Sharad Pawar
Sharad Pawar, Amit Shah, Narendra Modi
Sharad Pawar NCP likely to join BJP
NCP MP Bajrang Sonawane reacts to speculation over Sharad Pawar's party joining the NDA, asserting that all party MPs remain united.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com