Raver Loksabha : एकनाथ खडसेंच्या खासदारकीला काँग्रेसचा अपशकुन...

Eknath Khadse Vs Congress : काँग्रेसनेही रावेर लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Eknath Khadse-Nana Patole
Eknath Khadse-Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः एकनाथ खडसे यांनी उमेदवारी करावी, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावमध्ये झालेल्या मेळाव्यात केले होते. तसेच, खुद्द शरद पवार यांचीही ती इच्छा असल्याचे सांगितले जाते. मात्र, आता राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेच खडसेंच्या उमेदवारीमध्ये आडकाठी आणून अपशकुन केला आहे. (Congress party also claims Raver Lok Sabha constituency)

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख नेते आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खडसे यांनी स्वतः भाजपला कोंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानेही विद्यमान खासदार आणि खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी न देता पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Khadse-Nana Patole
Sangli Politics : अजितदादांचा जयंत पाटलांना सांगलीतच दे धक्का; अख्खी राष्ट्रवादी गळाला...!

अशा स्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघाचे राजकारण एकनाथ खडसे आणि भाजप यांच्याभोवती फिरत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने रावेर मतदारसंघावर दावा करीत खडसे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जाते.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस रावेर मतदारसंघावर दावा सांगत असतानाच आमदार शिरीष चौधरी आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील या काँग्रेसनेत्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी करण्याची मनीषा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse-Nana Patole
Modi Nashik Tour : कांद्याच्या माळा घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदींच्या स्वागताला जाणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रयत्न करावेत आणि रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडून घ्यावा, असे पत्र तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील यांनी पटोले यांना लिहिले आहे. रावेर, चोपडा, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर आणि मलकापूर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची स्थिती बळकट आहे. यासंदर्भात काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची तयारीदेखील सुरू आहे. त्यामुळे पटोलेंकडूनही जागावाटपाच्या चर्चेत प्राधान्याने रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आग्रह धरला जाईल, असे संकेत दिले आहेत.

Eknath Khadse-Nana Patole
Lok Sabha Election : कोल्हापुरात ‘बेंटेक्स’ उमेदवारीला विरोध; आघाडीनं कंबर कसली...

या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत जळगावच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये वेगळाच राजकीय सूर निर्माण झाल्याने एकनाथ खडसे यांच्या राजकीय मार्गक्रमणात काँग्रेसने अडथळा आणला आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Eknath Khadse-Nana Patole
Narendra Modi Nashik Tour : नरेंद्र मोदींनी नाशिकमधूनच लोकसभा लढवावी; महंतांची इच्छा पंतप्रधान स्वीकारतील ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com