Congress Protest : महायुती सरकारचा धिक्कार करणार ; कॉंग्रेस नेते खाणार शेतकऱ्यांसोबत 'पिठलं भाकरी' अन् ठेचा..

Congress ‘Pithla-Bhakri’ Protest : राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे, असा आरोप करत कॉंग्रेसने राज्यभर 'पिठलं भाकरी' आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Congress Protest : राज्यातील शेतकऱ्यावर यावर्षी मोठे संकट ओढावले आहे. अतिवृष्टीमुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. लोखो एकरवरील शेतीपिके नष्ट झाली आहेत. अशा परिस्थितीत त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीरे केलेले पॅकेज पुरेसे नाही. शेतकऱ्यांसाठी केलेली मदत तुटपुंजी असून महायुती सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे.

जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ सरकारने आणल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. त्यामुळे सोमवार, २० ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार असल्याचे कॉंग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांतील गावागावात हे आंदोलन होणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी एकत्र येऊन पिठलं-भाकर आणि ठेचा खाऊन भाजप -महायुती सरकारचा धिक्कार करणार आहेत.

काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, 'बळीराजा उद्ध्वस्त झाल्याने त्याला भरीव मदत आणि कर्जमाफीची आवश्यकता होती. पण सरकारने बनावट पॅकेज देऊन शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांतील ३५० तालुक्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे सर्व काही वाहून गेले. राज्यात बळीराज्याच्या लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे.

Congress
Sunil Bagul : कारवाईच्या भीतीने भाजप नेते सुनिल बागुल नाशिकमधून गायब? चौकशीनंतर अटकेची शक्यता

शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी ५ लाख रुपये व सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. पण भाजपा महायुती सरकारने जुन्याच योजनांची गोळाबेरीज करून ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण हे पॅकेज फसवे निघाले आहे असा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे.

Congress
NCP Sharad Pawar Politics: भाजपच्या वाटेवरील उदय सांगळे म्हणतात, सिन्नरला सर्व गटांत उमेदवार देणार!

शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देऊ असे सरकारने दिलेले आश्वासनही फसवे निघाल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याविरोधात प्रदेश काँग्रेसने सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना २० ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत निषेध करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर पिठलं भाकर आंदोलन करणार आहे. जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव करून देता येईल अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com