Sunil Bagul : कारवाईच्या भीतीने भाजप नेते सुनिल बागुल नाशिकमधून गायब? चौकशीनंतर अटकेची शक्यता

Nashik firing case : गंगापूर रोडवली विसेमळा गोळीबार प्रकरणात बागूल गॅंग कोठडीत आहे. काहींचा शोध सुरु आहे. गोळीबाराच्या गुन्ह्यात सहभागाच्या संशयावरुन सुनिल बागूल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Sunil Bagul bjp
Sunil Bagul bjpSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : विसेमळा ते रामवाडी मार्गावर मागील महिन्यात २५ सप्टेंबर रोजी सचिन साळुंके या व्यावसायिकावर झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजपचे नेते सुनील बागुल यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणात त्यांची यापूर्वीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. कारवाईच्या भीतीने आता त्यांनी नाशिक बाहेर अज्ञातस्थळी आसरा घेतल्याचे समजते.

पोलिसांनी या प्रकरणात सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल, सागर बागुल व गौरव बागुल या तिघांनाही अटक केली आहे. तसेच बागुल यांचे निकटवर्तीय असलेले व त्यांच्यासोबत भाजपमध्ये आलेल्या मामा राजवाडे व त्याच्या टोळीलाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीच्या दाखल असलेल्या एका गुन्ह्यात त्यांचा निकटवर्तीय अनिल शेंडगे यालाही अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात संशयित भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तर प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनाही अटक झाली होती. ते दोघेही सध्या कोठडीत आहेत. तसेच खंडणी वसुली व गोळीबार प्रकरणात रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, दीपक लोंढे व टोळीला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराच्या प्रकरणात कारवाई होऊ शकते अशी कुणकुण सुनील बागुल यांना लागल्यामुळे ते अज्ञातस्थळी पसार झाल्याची चर्चा आहे.

Sunil Bagul bjp
BJP Politics: महापालिकेतही सत्यजित तांबे पॅटर्न?, काही प्रभागात भाजप पुरस्कृत अपक्ष पॅनलच्या हालचाली?

विसेमळा गोळीबाराप्रकरणी बागुल गँग मधील अजय बागुलसह अजय बोरिसाला न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची (२२ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जोपर्यंत या गॅंगमधील फरार तुकाराम चोथवेसह इतर साथीदार ताब्यात येत नाहीत, तोपर्यंत बागुल टोळीच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजते. गोळीबाराच्या गुन्ह्यात सहभागाचा संशय असल्याने सुनिल बागुल यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान एका खंडणीप्रकरणात बागुल यांच्या संघटनेचे नाव आल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. बागूल यांच्या श्रमिक माथाडी बोर्ड गार्ड संघटनेच्या आडून खंडणी वसूल करणारा अनिल शेंडगे याला गंगापूर पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

Sunil Bagul bjp
NCP Sharad Pawar Politics: भाजपच्या वाटेवरील उदय सांगळे म्हणतात, सिन्नरला सर्व गटांत उमेदवार देणार!

विसेमळा गोळीबार प्रकरणात बागुल गँगचे संशयित सागर सुधाकर बागुल (रा. रामवाडी), संदीप रघुनाथ शेळके (४३, रा. रामवाडी), गौरव सुधाकर बागूल (रा. पंचवटी), प्रेमकुमार दत्तात्रय काळे (३५), वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे (२९, दोघे रा.रामवाडी), मामा उर्फ बाबासाहेब राजवाडे, अमोल भास्कर पाटील, अजय दिलीप बागुल, संदीप रघुनाथ शेळके, बाब्या उर्फ सचिन सुखलाल कुमावत व अजय जेठालाल बोरिसा यांना पोलिसांनी अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com