Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंना आउट ऑफ नाशिक पोस्टिंग, एकनाथ शिंदेंचा निर्णय ; उदय सामंताच्या एण्ट्रीने चर्चेला उधाण

Shiv Sena contact ministers : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या संपर्कमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. त्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेल्या मंत्री भुसेंना नाशिकच्या बाहेर जबाबदारी देण्यात आली आहे.
Dada Bhuse & Eknath shinde
Dada Bhuse & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : भाजपने जिल्हा प्रभारी नियुक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने देखील प्रत्युत्तर म्हणून २२ जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्र्यांची नियुक्त केली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संपर्कमंत्री अभियान सुरु केले आहे. यात एका संपर्कमंत्र्यांच्या खांद्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ मंत्र्यांवर एकुण २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. नाशिक जिल्ह्याच्या संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्याची अतिरिक्त धुरा देखील सामंत यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

तर मूळ नाशिक जिल्ह्याचे असलेल्या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे मात्र धुळे व बुलडाणा या दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हाती जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांचा कारभार सोपविण्यात आला आहे.

मंत्री दादा भुसेंच्या नियुक्तीवरुन नाशिकच्या राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे. स्थानिक आमदार असूनही गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये दादा भुसे यांना संधी न देता ती उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. भुसे यांना नाशिक ऐवजी धुळे -बुलडाणा जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली आहे.

Dada Bhuse & Eknath shinde
Dada Bhuse Politics : भाजपच्या संकटमोचकांवर शिवसेनेचे 'दादा' ठरले वरचढ, कुंभमेळा नगरीतूनच केलं हद्दपार..

नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वाद होऊ नये म्हणून महाजन यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून आजवर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही.

असे असताना पालकमंत्रीपदाच्या रेसमधील भुसेंना पक्षानेच नाशिकच्या बाहेर जबाबदारी दिल्याने साहजिकच नाशिकच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात असून चर्चा रंगल्या आहेत.

Dada Bhuse & Eknath shinde
Eknath Shinde News : अखेर एकनाथ शिंदेंनी मौन सोडले, ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीबाबत खरं खरं सांगितलं, म्हणाले,...

ज्या जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपचे पालकमंत्री आहेत, त्या ठिकाणीही मागे हटायचे नाहीत. शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून द्यावे असे आदेश एकनाथ शिंदे यांनी या संपर्कमंत्र्यांना दिले आहेत.

यातून आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे स्थगित असलेल्या २२ जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितींच्या निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com