Video Chhagan Bhujbal : मोठी बातमी! छगन भुजबळ अजित पवारांच्या पक्षात नाराज? सुनील तटकरे म्हणतात...

Chhagan Bhujbal Sunil Tatkare : छगन भुजबळांनी आपल्या कडक भाषणात महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता जोरदार हल्ला केला. त्यानंतरच्या काही तासांतच भुजबळांच्या स्वारी सिल्वर ओकच्या दारी गेली.
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal
Sunil Tatkare On Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाताहत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान रॅली बारामतीत थाटात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे नेते झाडून बारामतीत दाखल झाले. विधानसभेच्या निवडणुकीत ताकदीने लढणार, महायुती मजबूत राहणार छातीठोकपणे या नेत्यांनी सांगून टाकले. त्यात अजित पवारांच्या भाषणा पाठोपाठ छगन भुजबळांनी सभेचा ताबा घेऊन जोरदार बॅटींग केली.

आपल्या कडक भाषणात महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता जोरदार हल्ला केला. त्यानंतरच्या काही तासांतच भुजबळांच्या स्वारी सिल्वर ओकच्या दारी गेली. आणि महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले.

अजित पवारांच्याच Ajit Pawar पक्षाचे नव्हे तर महायुतीतील शिवसेना, भाजपाचे नेते भुजबळ पवार भेटवर बोलू लागले. विरोधकांनी या मुद्यात लक्ष घातले. त्यानंतर भुजबळ हे अजित पवारांच्या पक्षात नाराज आहेत. ते शरद पवारांकडे जाणार आहेत, असा वावड्या उठल्या. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली बाजू मांडली.

Sunil Tatkare On Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : आधी टीका नंतर भेट, पवारांशी चर्चेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सुनील तटकरे Sunil Tatkar म्हणाले, या भेटीमागचे प्रयोजन छगन भुजबळ हेच सांगतील. भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. भुजबळ साहेब नाराज नाहीत. कपोकल्पित काहाण्या पसरवू नये. त्यांनी बारामतीमध्ये जोरदार भाषण केले आहे. सिल्वर ओकवरील भेटीविषयी तेच सांगू शकतील, असे म्हणत भुजबळ अजित पवारांच्या सोबतच राहतील हे तटकरे यांनी ठासून सांगितले.

Sunil Tatkare On Chhagan Bhujbal
Contract Recruitment Decision : फसवाफसवी : शिंदे-फडणवीस सरकारची ठेकेदारी, प्रशासनात कंत्राटी भरतीची नफेखोरी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com