Dada Bhuse : एकनाथ शिंदेंचा विश्वासू मंत्री अडचणीत? निवडीला न्यायालयात चॅलेंज

Dada Bhuse victory challenged in court : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघातून विजयी झाले. त्यांना एक लाख 58 हजार 284 मते मिळाली.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News : विधानसभा निवडणूक निकालाला आव्हान देण्याचा कालावधी 45 दिवसांचा असतो. हा कालावधी आज (बुधवार) संपुष्टात आला. त्यामुळे राज्यभरातून उच्च न्यायालयात निकालांना आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिकमधून देखील तीन पराभूत उमेदवारांनी विजयी आमदारांना आव्हान दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघातून विजयी झाले. त्यांना एक लाख 58 हजार 284 मते मिळाली. अपक्ष उमेदवार बंडू काका बच्छाव यांना 51 हजार 678 मते होती. मतदानातील हा फरक संशयास्पद आहे. मतदानाची आकडेवारी आणि मतमोजणी या दोन्हींबाबत संशय व्यक्त करणारी याचिका अपक्ष बच्छाव यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या निवडी बाबत सतरा आक्षेप नोंदविले आहेत.

Eknath Shinde
Anjali Damania : वाल्मिक कराडबरोबर 'तो' नेता कोण? सोशल मीडियावर फोटो 'शेअर'; अंजली दमानियांची 'मोठी' मागणी

मालेगाव मध्य मतदारसंघातील एम.आय.एम.चे आमदार मौलाना मुक्ती इस्माईल यांच्या निवडीलाही अपक्ष उमेदवार माजी आमदार आसिफ शेख यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार असिफ शेख यांचा अवघ्या १६१ मतांनी निसटता पराभव झाला आहे. त्यामुळे निवडणूक मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद असल्याचा दावा माजी आमदार शेख यांनी केला आहे. त्यांची याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे.

कळवण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नितीन पवार हे देखील निसटत्या मताधिक्याने विजयी झाले होते. पवार यांना एक लाख 19 हजार 191 मते मिळाली. महाविकास आघाडी पुरस्कृत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांना एक लाख दहा हजार 759 मते मिळाली आहेत. मतदान प्रक्रिया, निवडणूक यंत्रणेतील गोंधळ तसेच मतदान यंत्रात दोष असल्याचा दावा माजी आमदार गावित यांनी केला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना उच्च न्यायालयाने याचिका दाखल झाल्याची माहिती कळविली आहे. या तिन्ही मतदारसंघांच्या मतदान यंत्र सय्यद पिंपरी येथील शासकीय गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. याबाबत न्यायालयाच्या पुढील सूचनेची प्रतीक्षा करण्यात येत आहे,असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी आज सांगितले.

Eknath Shinde
Shivsena UBT News : सात माजी महापौरांनी पक्ष सोडला, डझनभर माजी नगरसेवक रांगेत; तरी नेत्यांचा तोरा कायम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com