Manoj Jarange Vs Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

Ajay Baraskar On Manoj Jarange Patil : अजय बारस्करांनी काही दिवसांपूर्वी जरांगे-पाटील आणि त्यांच्या मराठा आंदोलनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित करून गंभीर आरोप केले होते.
Manoj Jarange, Ajay Maharaj Baraskar
Manoj Jarange, Ajay Maharaj BaraskarSarkarnama
Published on
Updated on

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय बारस्कर ( Ajay Barskar ) यांच्या नगरमधील कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. अजय बारस्कर यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. किरण बारस्कर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manoj Jarange, Ajay Maharaj Baraskar
Lok Sabha Election 2024 : अक्षय, युवराज अन् कंगणा भाजपकडून निवडणूक लढणार? 'या' मतदारसंघातून मैदानात उतरू शकतात

किरण बारस्कर हे एमआयडीसीमधील जिमखाना परिसरात असताना त्यांच्याकडे पाच जण आले. अजय बारस्कर ( Ajay Baraskar ) हे नगरमधील घरी आल्यावर त्यांना जिवे ठार मारू, अशी धमकी दिली. यानंतर किरण बारस्कर यांनी एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. विशाल शिवाजी घोलप (रा. घोलपवस्ती, निबंळक, ता. नगर), स्वप्नील चव्हाण, करण मापारी, अक्षय शेवाळ आणि सूरज शेवाळ (रा. नगर) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजय बारस्कर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे आणि त्यांच्या मराठा आंदोलनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित करून गंभीर आरोप केले होते. यानंतर अजय बारस्कर यांच्याविरोधात मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. मुंबई येथे सध्या वास्तव्यास असलेले अजय बारस्कर यांच्यावर हल्ले होत आहेत. अजय बारस्कर यांना यानंतर वारंवार धमक्या सुरू झाल्या आहेत. फोनवर धमक्या दिल्या जात आहेत. गोळ्या घालून ठार मारू, अशा स्वरूपाच्या धमक्या येत असल्याचे अजय बारस्कर यांनी म्हटले आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटील यांनी तुकाराम महाराज यांचा अपमान केला आहे. त्यांना मी कधीच सहन करणार नाही, असे सांगून अजय बारस्कर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Manoj Jarange, Ajay Maharaj Baraskar
Sambhaji Bhide News : मनमाडमध्ये भिडेंची गाडी अडवत काळे झेंडे दाखवले; भाजप आमदारानं फडणवीसांकडे केली 'ही' मागणी

दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मध्यंतरी गंभीर आरोप केले. विधिमंडळाच्या अधिवेशनात मनोज जरांगे यांच्या आरोपांवर घमासान झाली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशीची घोषणा झाली आहे. यानंतर मराठा आंदोलनाची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे दिसते. या अनुषंगाने मराठा समाज आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठका घेत आहेत. नगरमध्येदेखील शनिवारी ( 2 मार्च ) दुपारी बैठक होत आहे. या बैठकीत मराठा समाज आंदोलनाची दिशा ठरवून त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचे सांगितले जात आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Manoj Jarange, Ajay Maharaj Baraskar
Nitin Gadkari : नितीन गडकरी अचानक खर्गे, जयराम रमेश यांच्यावर का चिडले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com