
Shivsena Politics : शिंदे गाटत दाखळ होताच गोऱ्हे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवरच टिका केली आहे. त्या म्हणाल्या, समान नागरी कायदा असो की राम मंदिर, अगदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भाषण झाले तरी त्या संदर्भात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भूमिका मांडायचे. मात्र उद्धव ठाकरे भूमिका मांडत नाहीत व निर्णय देखील घेत नाहीत. (Neelam Gorhe criticise Shivsena leader Uddhav Thackeray on His politics)
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची साथ केली आहे. त्यानंतर आज येथे त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोणत्याच प्रश्नावर भूमिका घेत नाहीत, असे सांगितले.
उपसभापती गोरे यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतके दिवस काम केल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विचार केला.
त्या म्हणाल्या, समान नागरी कायदा, राम मंदिर या प्रकारचे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने घेतले आहे. त्याचबरोबर राज्यात चांगल्या पद्धतीने सरकार चालविले जात आहे. सर्वसामान्यांची प्रश्न सोडविले जात असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.
मी कुठल्याही पदासाठी किंवा स्थान टिकविण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला नाही. शिंदे योग्य मार्गावर असल्याने त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका घेतली. शिवसैनिक म्हणून व त्यातही महिला म्हणून मला मुख्यमंत्र्यांनी चांगली संधी दिली. त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड व नाशिकला धार्मिक पर्यटनासाठी निधी मिळावा यासाठी आपले प्रयत्न आहे.
आपत्ती, पुनर्वसन, रस्ते अपघात, महिला सुरक्षा, महिला धोरण यावर मी पुढे काम करणार आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांच्यासोबत मी पुणे येथे मोठे काम केले आहे. त्यांच्या कामाचा मला अनुभव आहे. ते धडाडीने काम करतात त्याचा राज्यातील जनतेला व सत्ताधारी पक्षांना फायदा होईल. कायद्याने शिवसेना शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
माझ्यावर अविश्वास ठराव आणला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याला अर्थ नाही. उद्धव ठाकरे भूमिका मांडत नाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भूमिका मांडत होते अगदी लाल किल्ल्यावर झालेल्या भाषणाचा उल्लेख करत ते स्वतःची व पक्षाची भूमिका जाहीर करत होते मात्र सध्या उद्धव ठाकरे भूमिका मांडण्यात कमी पडतात अशी टीका त्यांनी केली.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, संपर्क नेते राजू लवटे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रविण तिदमे आदी यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.