Video Amrish Patel : फडणवीसांचा आमदार शरद पवारांच्या स्वागतला, भाजपला धक्का?

Amarish Patel Welcome Sharad Pawar : अमरीश पटेल हे काँग्रेस आमदार होते. 2019 ला काँग्रेसची साथ सोडून ते भाजपसोबत गेले. शिरपूर मतदारसंघातून ते सलग चार वेळा 1990, 1995, 2000, 2005 या काळात आमदार राहिले आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Amrish Patel News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शेतकरी मेळाव्यासाठी आज धुळे जिल्ह्यात आले होते. शिंदखेडा येथे शरद पवार शेतकऱ्यांना संबोधित करणार होते. शिरपूर विमानतळावार शरद पवार यांचे आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील आमदार अमरिश पटेल हे शरद पवारांच्या स्वागतासाठी हजर होते.

अमरिश पटेल यांना पाहून शरद पवार म्हणाले, तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथं कसे? असा सवाल केला. तर, अमरिश पटेल, म्हणाले पक्ष वगैरे काय असतो साहेब? त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

अमरीश पटेल हे काँग्रेस आमदार होते. 2019 ला काँग्रेसची साथ सोडून ते भाजपसोबत गेले. शिरपूर मतदारसंघातून ते सलग चार वेळा 1990, 1995, 2000, 2005 या काळात आमदार राहिले आहेत. तर 2009, 2015 आणि 2019 असे तीन वेळा विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. 2019 ला काँग्रेसची साथ सोडल्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली.

Sharad Pawar
Assembly Election 2024 : पुण्यातील दोन जागांसाठी 'मविआ'तील 40 जण इच्छुक; 'ते' फेवरेट मतदारसंघ कोणते?

भाजपची साथ सोडणार?

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधून महाविकास आघाडीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात अमरिश पटेल हे शरद पवारांच्या स्वागतासाठी गेल्याने ते महाविकास आघाडीत जातील, अशा चर्चा रंगल्या आहेत.

मोदी सरकार शेतकरी विरोधी

शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले, मोदी सरकार आलं आणि ज्या शेतकऱ्यांनी उसातून विविध पूरक उत्पादनं घ्यायचं ठरवलं त्यावर बंधन घातली. त्यावर मर्यादा घातल्या. गहू-तांदूळ हे महाराष्ट्रात, देशात महत्त्वाचं पीक. मोदी सरकारने त्याच्यावरही बंधनं घातली. जे काही तुम्ही पिकवता आणि तुम्हाला घामाची किंमत ज्या उत्पादनावर मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूत्र आजच्या मोदींच्या सरकारने स्वीकारलं आहे. म्हणून आम्ही सांगतो हे मोदी सरकार बळीराजाविरोधी आहे, शेतकरीविरोधी आहे.

Sharad Pawar
Uddhav Thackeray : 'मीच तुझा भाऊ, सर्व फुकट खाऊ'; महायुती सरकारवर उद्धव 'ठाकरी' शैलीत बरसले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com