Girish Mahajan News: सिंहस्थ कुंभमेळा हा राज्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रशासकीय स्तरावर त्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी मुंबईत आढावा घेतला आहे. शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
येत्या रविवारी (ता. २३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक होत आहे. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीत महत्त्वाच्या घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची यापूर्वी पालकमंत्री म्हणून घोषणा झाली होती. मंत्री महाजन यांच्याकडेच सिंहस्थ कुंभमेळ्याची ही जबाबदारी देण्यात आली आहे. या स्थितीत येत्या रविवारी होणाऱ्या बैठकीआधी पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का, याची उत्सुकता आहे.
राज्यातील नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली होती. महायुतीतील घटक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून ही हरकत घेण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांना आपले समर्थक पालकमंत्री हवे आहेत.
नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना शिंदे पक्ष आग्रही आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उघडपणे तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. या स्थितीत रविवारी मुख्यमंत्र्यांचा नाशिकला दौरा होत आहे. त्या अनुषंगाने यावर तोडगा काढून गिरीश महाजन यांना पालकमंत्री म्हणून संधी मिळणार का, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. त्यासाठी विविध चाळीसहून अधिक विभाग आपले प्रस्ताव आणि आराखडे सादर करून त्यावर काम करणार आहेत. त्या दृष्टीने पालकमंत्री पद नसल्यास समन्वयात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात याबाबत तोडगा निघून महाजन यांची नियुक्ती होते की अघोषित पालकमंत्री म्हणून त्यांना या बैठकीत महत्त्व मिळते, याकडे महायुतीचे घटक पक्ष डोळे लावून बसले आहेत.
-----
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.