Dhule Municipal Corporation

धुळे महानगरपालिका ही उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. 2013 मध्ये धुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. २०१८ मध्ये धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. 74 पैकी 50 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने सत्ता स्थापन केली. काँग्रेसने 6, तर राष्ट्रवादीने 8, जागा जिंकल्या. एमआयएमने 4 जागांवर खातं उघडलं. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी 2 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली. यंदा धुळ्यात भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी लढत बघायला मिळू शकते.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com