Shivsena UBT : अनिल गोटेंच्या उमेदवारीमुळे ठाकरे गटात खदखद कायम; माजी आमदार आज घड्याळ हातात बांधणार

Sharad Patil joins NCP : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप व त्यातून निर्माण झालेली खदखद अद्यापही कायम आहे. विशेषत: धुळे जिल्ह्यात पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. त्याचा परिणाम शिवसेना ठाकरे पक्षावर झाला आहे.
Anil Gote Shivsena UBT
Anil Gote Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Dhule News, 03 May : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप व त्यातून निर्माण झालेली खदखद अद्यापही कायम आहे. विशेषत: धुळे जिल्ह्यात पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. त्याचा परिणाम शिवसेना ठाकरे पक्षावर झाला आहे.

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते शरद पाटील आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांनी दिलेला आत्मविश्वास आणि धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठाचे निर्मिती या आश्वासनासाठी आपण राष्ट्रवादीत जात असल्याचं शरद पाटील यांनी सांगितलं आहे.

धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत धुळे शहर ही एकमेव जागा शिवसेना ठाकरे पक्षाने घेतली होती. मात्र येथे अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात पक्षाच्या इच्छुकांना बाजूला ठेवण्यात आले त्यातून असंतोष निर्माण झाला. नेत्यांमध्ये नाराजी वाढली होती. माजी आमदार शरद पाटील यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने ती अद्यापही कायम आहे, हे स्पष्ट होते.

Anil Gote Shivsena UBT
Ajit Pawar : "मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजितदादांच्या मनातलं पुन्हा एकदा आलं ओठांवर

शरद पाटील 2004 मध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघातून आमदार होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र फार काळ ते काँग्रेस पक्षात रमले नाही व पुन्हा शिवसेनेत परतले. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

माजी आमदार शरद पाटील 2014 पासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते. शिवसेना पक्षप्रमुख तसेच पक्षाचे नेते संजय राऊत यांनी धुळे जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत त्यांना विविध आश्वासने दिली होती. मात्र, पक्षात योग्य सन्मान आणि पुनर्वसन न झाल्याने ते नाराज होते.

धुळे शहर मतदार संघातून माजी आमदार गोटे यांना संजय राऊत यांनी शिवसेनेची जागा सोडली होती. ठाकरे पक्षाचे तीन ते चार नेते उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र जिल्ह्यातील सर्वच इच्छुकांचा उमेदवारीची संधी न मिळाल्याने भ्रमनिरास झाला.

Anil Gote Shivsena UBT
Kolhapur Politics : "तुम्ही 84 वर्षाचे होणार, रिटायरमेंट घ्या अन्..."; ठाकरे गटातून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या के.पी पाटलांना अजितदादांनी सुनावलं

विधानसभा निवडणुकीतील ही अस्वस्थता संपविण्यासाठी पक्षाकडून कोणताही प्रयत्न झाला नाही. त्याचा परिणाम म्हणून विधानसभेच्या निकालानंतर महायुती प्रबळ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व नव्हते. मात्र सत्तेच्या प्रभावामुळे हा पक्ष आता हातपाय पसरू लागल्याचे चित्र आहे.

धुळे जिल्ह्यात आगामी काळात कृषी विद्यापीठ व्हावे, माजी आमदार शरद पाटील यांची मागणी आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना तोंड भरून आश्वासन दिले आहे. लवकरच याबाबत धुळे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करू, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com