
Dhule News : महावितरणकडून अवाजवी बिलाची आकारणी केल्याची ओरड कायमच कुठे न कुठे ऐकायला मिळते. आता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात तशाचप्रकारे महावितरण विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. शिरपूर तालुक्यातील एका गावात झोपडीत राहणाऱ्या आणि मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या ७० वर्षीय आदिवासी वृद्द महिलेला तब्बल 83 हजारांचे लाईटबिल पाठवण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे, या महिलेच्या झोपडीत फक्त 60 वॅटचा एक बल्ब आणि एक टेबल फॅन आहे. असे असताना या महिलेला पाठवण्यात आलेल्या भरमसाठ बिलामुळे वृद्द महिलेला धक्काच बसला. शिवाय यावरून पुन्हा एकदा महावितरणच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाली आहे.
या वृद्ध महिलेचं नाव इंदूबाई हिरालाल भील असं आहे. त्या शिरपूर तालुक्यातील लौकी या गावी आपला मुलगा, सून आणि नातवांसह एका झोपडीत अत्यंत साध्या परिस्थितीत राहतात. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांच्या घराला महावितरणकडून वीजजोडणी मिळाली होती. मात्र मागील दोन महिन्यांपासून त्यांना तब्बल ८० हजार रुपयांहून अधिक वीजबिलाची देयकं येऊ लागली आहेत. या अनपेक्षित आणि भरमसाठ बिलामुळे सर्व कुटुंब चिंतेत आहे.
इंदूबाई यांच्या मुलाने यासंदर्भात अनेकद महावितरण कार्यालयात तक्रारी केली. मात्र अद्याप महावितरणकडून त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. चुकीच्या आलेल्या बिलामुळे त्यांच्या कुटुंबाला नाहक आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. महावितरणने पाठवलेलं बील कमी करुन मिळावे अशी त्यांची मागणी आहे.
घरात केवळ एक फॅन व एक बल्ब असताना ८३ हजारांचे बील येणं ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे वृद्ध महिलेवर अन्याय झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. यावर सोशल मीडियातूनही संताप व्यक्त होतो आहे. या प्रकरणाची योग्य ती योग्य चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (DHULE NEWS)
दरम्यान महावितरणकडून वीज ग्राहकांच्या घरोघरी जाऊन नवीन वीज मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु याबाबत परवानगी नसताना वीज मीटर बदलले जात असल्याने ग्राहकांकडून ओरड सुरु आहे. तर ज्यांचे मीटर बदलण्यात आले आहेत. त्यांच्या वीज बिलात दुपटीने वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. इतकेच नाही तर विजेचा अधिक वापर नसताना देखील सरासरी बिलाची आकारणी करून वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे, अशीही ओरड अनेकांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.