Pune Rave Party : कुटुंब अडचणीत..नणंद आणि सासरे टेन्शनमध्ये.. रक्षा खडसे यांनी 6 दिवसांनी दिलेली प्रतिक्रिया काय?

Raksha Khadse : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी एका कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली आहे. खडसे कुटुंब सध्या संकटात आहे, खेवलकरांना सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे.
Raksha Khadse
Raksha KhadseSarkarnama
Published on
Updated on

Raksha Khadse : पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई व महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे खडसे कुटुंबीय मोठ्या अडचणींचा सामना करत असून त्यांची धावाधाव सुरु आहे. प्रांजल खेवलकर यांना सोडवण्यासाठी सासरे एकनाथ खडसे व पत्नी रोहिणी खडसे दोघांचे प्रयत्न सुरु आहेत.

पुण्यातील या रेव्ह पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकली होती. त्यात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. यासंदर्भात एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांनी त्याच दिवशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. मात्र यादरम्यान एकनाथ खडसे यांच्या स्नुषा तथा रोहिणी खडसे यांच्या भावजय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे अद्याप मौन होते. त्यांनी या प्रकरणावर कोणतीही भूमिका घेतली नव्हती.

रक्षा खडसे यांनी सहा दिवसांनंतर आज (दि. २) या सगळ्या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यातही त्यांनी पुणे रेव्ह पार्टीप्रकरणावर भाष्य करण टाळलं. मी केंद्रीय मंत्री पदासारख्या एका जबाबदार पदावर आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत मी त्यावर बोलणे टाळले पाहीजे असे त्या म्हणाल्या.

Raksha Khadse
Nashik Kumbh Mela : कुणी निधी देता का निधी.. नाशिक महापालिकेवर कुंभमेळ्यासाठी कर्ज काढण्याची वेळ

विशेष म्हणजे याप्रकरणानंतर खडसे कुटुंबीय प्रचंड तणावात आहे. अशात रक्षा खडसे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांनी याप्रकरणावर बोलताना अत्यंत संयमित प्रतिक्रिया दिली. सद्यस्थितीत सर्व गोष्टी न्यायालयात गेल्या आहेत. पोलिस देखील त्याची चौकशी करत आहेत. याप्रकरणात जे सत्य आहे ते पुढे येईल. सत्य समोर येत नाही तोवर मी बोलणे उचित होणार नाही असं त्या म्हणाल्या.

रक्षा खडसे यांच्या ननंद रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी संपूर्ण कुटुंब संकटात आहे. आजच रोहिणी खडसे यांनी रेव्ह पार्टी प्रकरणात शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची माहिती पवारांना दिली. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांच्या विरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. कुटुंब संकटात असताना रक्षा खडसे यांनी घेतलेल्या या संयमित भूमिकेची राजकीय वर्तुळात मात्र जोरात चर्चा आहे.

Raksha Khadse
Pankaja Munde : कृषी खात्याच्या अदला-बदलीवर पंकजा मुडेंचे 'नो कमेंट्स' ; म्हणाल्या मी फक्त माझ्या..

दरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि काही व्हिडीओ सापडल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. मात्र, प्रांजल खेवलकर यांनी पत्नी रोहिणी खडसेंना पार्टीमधील मुलींसोबत आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. न्यायालयात काय गोष्टी घडल्या हे मी तुम्हाला जास्त सांगू शकत नाही असं रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com