Diesel petrol shortage : डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा; देवाभाऊंनी मात्र व्यक्त केली वेगळीच शंका!

petrol diesel supply issue in rural Maharashtra : महाराष्ट्रात डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. दरम्यान, देवा भाऊंनी इंधन तुटवड्याबाबत वेगळीच शंका व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
devendra fadnavis
devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अचानक पेट्रोल पंपांवर तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी रात्रभर पंपांवर मुक्काम करीत आहेत. डिझेल मिळत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. गेल्या आठवड्यांपासून अचानक पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

खरीप पूर्व मशागतीची कामे सध्या राज्यभर सुरू आहेत. पावसाचे आगमन केव्हाही होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि यंत्रांना डिझेलची तीव्र मागणी आहे. संदर्भात टंचाईमुळे शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

devendra fadnavis
Ambadas Danve : "जनतेच्या हातातून गाड्या हिरावून हातगाड्या देणे हाच का तुमचा मास्टरस्ट्रोक?"; इंधन टंचाईवरून ठाकरेंच्या पक्षाचा सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल!

त्याच्या राजकीय प्रतिक्रिया राज्यभर उमटू लागल्या आहेत. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी टंचाई नसल्याचा दावा केला. प्रत्यक्षात जळगाव धुळे यांसह मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघातच डिझेलसाठी पंपांवर शेतकरी तळ ठोकून असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्यात अनेक ठिकाणी टंचाई असल्याच्या तक्रारी आल्याचे त्यांनी मान्य केले. या संदर्भात तातडीने उपाययोजना करून प्रश्न सोडविण्याचे आदेश त्यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात वेगळीच शंका व्यक्त केली आहे. दरवर्षी सामान्यपणे डिझेल आणि पेट्रोलची किती मागणी असते याची माहिती आपल्याकडे आहे. त्या तुलनेत 20 ते 30 टक्के अधिक मागणी होत असल्याचे आढळले ते त्यांनी सांगितले.

devendra fadnavis
राज्य निवडणूक आयोगाने एका झटक्यात 220 पक्षांची नोंदणी केली होती रद्द, काय घडलं होतं?

शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी अनधिकृतपणे साठेबाजी तर करीत नाही ना? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर विभागीय महसूल आयुक्त यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. कोणीही शेतकऱ्यांच्या नावाखाली पेट्रोल डिझेल खरेदी करून साठेबाजी करीत असल्यास कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com