Dindori Lok Sabha Election: भाजप-माकपचे नेते शरद पवारांची 'तुतारी' हाती घेणार?

Sharad Pawar News: दिंडोरी मतदारसंघातून शरद पवार गटाकडे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारीची मागणी केली आहे, तर आता भाजपचे एन. डी. गावित यांनीही पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
Sharad Pawar, Tutari
Sharad Pawar, TutariSarkarnama
Published on
Updated on

NCP Sharad Pawar News : दिंडोरी मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे अनेक प्रतिस्पर्धी पक्षाचे नेते शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी संपर्क करीत आहेत. या नेत्यांनी उमेदवारीसाठी तुतारी हाती घेण्याची तयारी दर्शविली आहे.

दिंडोरी मतदारसंघात (Dindori Constituency) भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे आहे. शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून भास्करराव भगरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उमेदवारीसाठी अनेकांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिंडोरी मतदारसंघातून शरद पवार गटाकडे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीचे तयारी दाखविली होती. आता भाजपचे (BJP) एन. डी. गावित यांनीही शरद पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामूळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Sharad Pawar, Tutari
Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार गटाला सुरुंग? झिरवाळ शरद पवारांच्या संपर्कात

माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासाठीही कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा सादर केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार जे. पी. गावित या मतदारसंघातील पेठ आणि सुरगाणा भागात विशेष प्रभाव असलेले नेते आहेत. त्यांनीदेखील या जागेची मागणी केली होती. मात्र, सीपीएम पक्षाच्या चिन्हाला मतदारसंघातील निफाड येवला, चांदवड या भागात मतदारांना फारसे स्वीकार्य वाटत नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा झाल्यानंतर गावित यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीची नावावर उमेदवारी करण्याची तयारी दाखविली आहे.

Sharad Pawar, Tutari
Shirdi Lok Sabha Election 2024 : शिर्डीत शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना, रिपाइं अन् मनसेचा 'पत्ता कट'

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर येथे मोठे आंदोलन झाले होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रादेखील या भागातून गेली होती. त्यावेळी राहुल गांधींनी कांदा उत्पादकांची परिषद घेतली होती. त्यामुळे सध्या या मतदारसंघातील वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल वाटते. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षातील इच्छुकांनाही शरद पवारांची तुतारी हाती घ्यावीशी वाटू लागली आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com