Eknath Shinde Banners : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा; कार्यकर्ते म्हणतात...

राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जळगावात बॅनर लावण्यात आले आहेत.
Eknath Shinde Banners
Eknath Shinde BannersSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जळगावात बॅनर लावण्यात आले आहेत.असेच बॅनर राज्यभरात लागणार असल्याचे सांगण्यात आले.मात्र या बॅनरची जळगावात जोरदार चर्चा सुरू आहे.

जळगाव शहरात अनेक भागात शिवसेना शिंदे गटातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मेहनती, प्रामाणिक, निडर असे लिहिण्यात आले आहे. त्यावर शिंदे जनतेला भेटत असल्याचे फोटोही आहेत. त्यावर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह असून, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे फोटो आहेत. जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत

Eknath Shinde Banners
MU Senate Election : 'राजाबाई टाॅवर' मंत्रालयासमोर झुकलेच; 'सिनेट'वरून ठाकरे गटाची शेलक्या शब्दात टीका !

निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे जनतेसाठी दिवसरात्र काम करीत आहेत. ते जनतेच्या हिताचे निर्णय फटाफट घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक जनताही करीत असून समाधान व्यक्त करीत आहेत. सर्वसामान्य जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून आम्ही हे फलक लावले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात असे फलक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते लावणार आहेत.

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार यांना मुख्यमंत्री पद दिले जाणार असल्याचा दावा केला. विद्यमान मुख्यमंत्री महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभा निवडणुकांना सामोरं जाता येणार नाही. या विचाराने अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री केलं जाईल. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अजित पवारांची गरज आहे.असा दावा चव्हाण यांनी केला होता.

Eknath Shinde Banners
MU Senate Election : मोठी बातमी ! मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला अचानक स्थगिती; कारण मात्र गुलदस्त्यात..

पण मुख्यमंत्री बदलाची कुठली चर्चा झालेली नाही. महायुतीतल्या लोकांनी असे दावे करून गोंधळ निर्माण करणं तात्काळ बंद करावं. कारण यातून महायुतीतच संभ्रम होत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com